PM Kisan Samman Nidhi Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 15 वा हप्ता जारी केला. देशभरातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. पीएम किसान सन्मान निधी, शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन मानली जाते. पीएन किसान लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे आर्थिक सहाय्य देते.
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी शेतकर्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा करते. केंद्र सरकारने 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जारी केला होता. आज चार महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरावा हफ्ता जमा झाला आहे.
पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर
बिरसा मुंडा यांच्या जयंती आणि आदिवासी गौरव दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या जन्मस्थळी पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी, पंतप्रधान मोदींनी आज, 15 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता देखील जारी केला आहे. डीबीटीद्वारे देशातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवण्यात आले आहेत.
लाभार्थी यादी येथे तपासा
- सर्वात आधी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
- येथे तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय मिळेल.
- येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.
- नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा.
- या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
- तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर प्रविष्ट करा. यानंतर Get Data वर क्लिक करा.
- येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
- जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :