PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जगात लोकप्रियता वाढत असल्याचे दिसत आहे. कारण नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलने व्ह्यूज आणि सब्सक्राइबरच्या बाबतीत भारत आणि जगातील इतर नेत्यांच्या यूट्यूब चॅनेलला मागे टाकले आहे.  पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनेलवर 2 कोटी सब्सक्राइबर झाले आहेत. पंतप्रधान मोदी हे नेहमीच डिजिटल युगाला प्रोत्साहन देत आहेत. त्यांची गणना अशा नेत्यांमध्ये केली जाते ज्यांनी डिजिटल लेन्सद्वारे राजकारणाचे जग पहिले आहे. आज त्याचे यूट्यूब चॅनल जगातील इतर कोणत्याही नेत्याच्या यूट्यूब चॅनेलपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स असलेले चॅनल बनले आहे. 


सध्या नरेंद्र मोदी चॅनलचे 2 कोटींहून अधिक सदस्य आहेत. पीएम चॅनलची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यावर अपलोड केलेले व्हिडिओ लोकांना आवडतात. अनेकदा एखाद्या व्हिडिओला काही सेकंदात लाखो व्ह्यूज मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. 


हा नेता पंतप्रधानांनंतर दुसऱ्या क्रमांकावर 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक सबस्क्राइबर्स असलेल्या जागतिक नेत्याचे नाव काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनोरा यांचा दुसरा क्रमांक आहे. त्याच्या चॅनलचे 64 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. जे नरेंद्र मोदी यूट्यूब चॅनलच्या एक तृतीयांशपेक्षा थोडे कमी आहे. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या YouTube चॅनेलला देखील अधिक व्ह्यूज आहेत. 


राहुल गांधी भारतात दुसऱ्या क्रमांकावर 


राहुल गांधींच्या YouTube चॅनेलचे 2023 मध्ये 22.5 लाख सदस्य झाले आहेत, तर नरेंद्र मोदी चॅनलने 2023 मध्ये 63 लाख सदस्यांसह जवळपास तिप्पट सदस्य जोडले आहेत. 2023 मध्ये भारतात सर्वाधिक नवीन सदस्य जोडणाऱ्या नेत्या आणि राजकीय पक्षाच्या यूट्यूब चॅनेलबद्दल बोलायचे तर, येथेही पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. राहुल गांधी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेस पक्षाच्या चॅनेलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Lok Sabha Election : नरेंद्र मोदी की राहुल गांधी, थेट पंतप्रधान निवडायचा तर लोकांची कुणाला पसंती? ओपिनियन पोलमधून समोर आली आश्चर्यकारक माहिती