PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (5 ऑक्टोबर) देशातील करोडो शेतकऱ्यांना (Farmers) नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidh) 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत.


PM किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू 


PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यात राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला.


2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे कार्यक्रमात सहभागी


यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह सुमारे 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कसे तपासायचे?


जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी प्रथम https://pmkisan.gov.in/ वर जा.


मुख्यपृष्ठावरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा.


यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा.


यानंतर Get Status वर क्लिक करा.


यानंतर, हप्त्याशी संबंधित स्थिती स्क्रीनवर दिसेल.


मोबाईल ॲपद्वारे शेतकरी त्यांच्या पेमेंटची स्थिती तपासू शकतात.


ई-केवायसी आवश्यक


पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल.


महत्वाच्या बातम्या:


PM Kisan : लाडक्या बहिणींच्या अगोदर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये येणार, किती जणांना पैसे मिळणार?