PM Kisan Samman Nidhi 15th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 15 व्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण, एका चुकीमुळे शेतकऱ्यांचं 2 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकतं. पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता केंद्र सरकार लवकरच जारी करेल. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) सुरू केली आहे.
पीएम किसान योजनेसाठी महत्वाची बातमी
पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. आता लवकरच केंद्र सरकारकडून 15 वा हप्ता जारी करणार आहे. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणं बंधनकारक आहे.
जुलैमध्ये 14 वा हप्ता जारी
27 जुलै 2023 रोजी सीकर, राजस्थान येथून, पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता, त्यानंतर शेतकऱ्यांना आता 15 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. लवकरच पंधराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.
ई-केवायसी करणे बंधनकारक
पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल, तर ते लवकर करा, नाहीतर तुम्हाला 15 व्या हप्त्याचे पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते.
ई-केवायसी कसं करावं?
- पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- मुख्यपृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
- सर्च पर्यायावर क्लिक करा.
- आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
- मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
- सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली.
फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करा, कसं ते जाणून घ्या.
- तुम्ही फेस ऑथेंटिकेशनद्वारेही ई-केवायसी करू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जा.
- पीएम किसान अॅप डाउनलोड करा.
- पीएम किसान अॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर, फेस ऑथेंटिकेशनद्वारे पीएम किसान eKYC चे पेज उघडेल.
- सर्व माहिती भरा आणि OTP पडताळणी करा.
- फेस ऑथेंटिकेशनद्वारे PM किसान eKYC चा डॅशबोर्ड उघडेल.
- इतर लाभार्थींसाठी eKYC या पर्यायावर क्लिक करा.
- फेस ऑथेंटिकेशनद्वारे PM किसान eKYC चे एक नवीन पेज उघडेल.
- येथे विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर Proceed या पर्यायावर क्लिक करा.
- फेस ऑथेंटिकेशनद्वारे PM किसान eKYC चे पेज पुन्हा उघडेल.
- येथे स्कॅन फेस या पर्यायावर क्लिक करून तुमचा चेहरा स्कॅन करा.
- चेहरा स्कॅन होताच, तुमचा PM फेस ऑथेंटिकेशन eKYC पूर्ण होईल आणि तुम्हाला त्याचा संदेश मिळेल.