PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना चालवल्या जातात. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana). आतापर्यंत या योजनेचे 18  हप्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता 19 वा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान तुम्हाला जर 19 वा हप्ता हवा असेल तर काही महत्वाची कामे पूर्ण करावी लागतील.

शेतकरी नोंदणी आवश्यक 


पीएम किसानसह इतर कृषी योजनांसाठी शेतकरी नोंदणी आवश्यक आहे. कृषी मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. डिसेंबर 2024 पासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना शेतकरी नोंदणी केल्याशिवाय दिला जाणार नाही, असा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करावी?


कोणताही शेतकरी upfr.agristack.gov.in पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करून ऑनलाइन पद्धतीने शेतकरी नोंदणी करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि ज्यावर ओटीपी येतो तो मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲप (फार्मर रजिस्ट्री UP) आणि वेब पोर्टल upfr.agristack.gov.in द्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात. तसेच शेतकरी कोणत्याही सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) ला भेट देऊन शेतकरी नोंदणी करू शकतात, यासाठी आधार ओटीपी मिळविण्यासाठी त्यांच्याकडे आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. शेतकरी नोंदणीची अंतिम तारीख ही 31 जानेवारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 31 जानेवारीच्या आत शेतकरी नोंदणी आवश्यक आहे.

शेतकरी नोंदणी करण्याचे फायदे


पीएम किसान सन्मान निधीसाठी पात्रतेसाठी शेतकरी नोंदणी आवश्यक आहे. याशिवाय किसान सन्मान निधीचा आगामी हप्ता मिळणार नाही.

शेतकरी नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज भासणार नाही.

कोणत्याही कागदपत्रांशिवाय पात्रतेनुसार त्याच दिवशी डिजिटल KCC द्वारे बँकेकडून जास्तीत जास्त 02 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

कृषी व कृषी संबंधित विभागाच्या सर्व योजनांमध्ये अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा भरपाई आणि आपत्ती निवारण मिळणे सोपे होणार आहे.

किमान आधारभूत किमतीवर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाइन माध्यमातून करता येईल.

संस्थात्मक खरेदीदारांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळू शकेल.

शेतकरी नोंदणी आणि इतर अपडेट्स मिळाल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यास मदत होईल.