मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दिली गेली आहे. केंद्र सरकारनं या योजनेची सुरुवात 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसानचे 18 हप्ते मिळाले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना 36 हजार रुपयांची रक्कम मिळाली आहे. आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
18 हप्त्यांचे 36000 रुपये मिळाले, 19 वा हप्ता कधी?
पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु झाल्यापासून ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. म्हणजेच त्यांना एकूण 36000 रुपये मिळाले आहेत. आता 19 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनवेर 3.46 ला कोटी रुपयांची रक्कम खर्च करण्यात आली आहे. देशातील 18 व्या हप्त्यांपर्यंत या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 11 कोटींपर्यंत होती. 18 व्या हप्त्याची रक्कम जवळपास 9 कोटी 58 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे.
नव्यानं शेतकऱ्यांची नोंदणी
पीएम किसान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याचा अधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी विकसित भारत सकंल्प यात्रा अभियानाद्वारे 1 कोटी शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत. तर, जून 2024 पासून 25 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करुन घेण्यात आलं आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांकडून नवीन नोंदणी ज्यावेळी करण्यात येईल तेव्हा त्यांच्याकडे फार्मर आयडी असणं देखील आवश्यक असणार आहे. फार्मर आयडी काढलेल्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळं पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणीची प्रक्रिया सोपी होती.
पीएम किसान सन्मान निधी योजनेतून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी, त्यांच्या उत्पन्नात हातभार लावावा या उद्देशानं सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही अडचणी शिवाय पीएम किसानची रक्कम मिळवायची असल्यास लँड सिडिंग, ई केवायसी अशा प्रकारच्या बाबी पूर्ण करुन घेणं आवश्यक आहे.
इतर बातम्या :