Business News :  पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम 2025 (PM Internship Scheme 2025) च्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 738 हून अधिक जिल्ह्यांमध्ये देशातील 300 हून अधिक टॉप कंपन्यांकडून 1 लाख 19 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या इंटर्नशिप (Internship) ऑफर केल्या जात आहेत. 21 ते 24 वर्षे वयोगटातील बेरोजगार (unemployed) तरुण 12 मार्चपर्यंत या योजनेसाठी अर्ज करु शकतात. या राउंडमध्ये, अर्जदार शेवटच्या तारखेपर्यंत त्यांच्या पसंतीच्या जिल्हा, राज्य आणि क्षेत्रानुसार कमाल 3 इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्हाला एक ऑफर आवडत नसेल तर तुम्ही दुसऱ्यासाठी अर्ज करू शकता.

Continues below advertisement


कसा कराल ऑनलाइन अर्ज? 


तुम्हाला https://pminternship.mca.gov.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अशा तरुणांनाही या योजनेचा लाभ घेता येईल जे पूर्णवेळ नोकरीत नाहीत किंवा कुठेही पूर्णवेळ शिक्षण घेत नाहीत. यासोबतच त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी नसावी आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे वार्षिक उत्पन्न 4 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सदस्यांमध्ये अर्जदार, तिचा पती, पत्नी आणि पालकांचा समावेश आहे. दरम्यान, जे पात्र उमेदवार असतील त्यांनी तातडीनं या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


तरुणांना कंपनीनुसार कौशल्य शिकण्याची संधी मिळणार


सन 2030 पर्यंत, दरवर्षी 78.5 लाख महाविद्यालयांमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक दोन तरुणांपैकी अंदाजे एका तरुणाकडे रोजगारक्षम कौशल्ये नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने पीएम इंटर्नशिप योजना सुरू केली होती. यामध्ये तरुणांना कंपनीनुसार कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे.


पदवीधरांसाठी 36901 इंटर्नशिपच्या संधी 


या दुसऱ्या फेरीत, गॅस, ऊर्जा, बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रवास, ऑटोनॉटिक, धातू आणि खाण, उत्पादन, FMCG, RIL, HDFC बँक, ONGC, आयशर मोटर्स, NTPC, मार्टी सुझुकी आणि L&T या क्षेत्रातील अनेक कंपन्या इंटर्नशिप करतील. त्याच वेळी, 10वी उत्तीर्ण लोकांसाठी 24696 इंटर्नशिपच्या संधी, ITI झालेल्या तरुणांसाठी 23629, डिप्लोमाधारकांसाठी 18589 , 12वी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी  15142 आणि पदवीधरांसाठी 36901 इंटर्नशिपच्या संधी आहेत.


दरमहा 5000 रुपये मिळणार


वर्षभराच्या इंटर्नशिप दरम्यान तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5000 रुपये दिले जातात. या योजनेच्या पथदर्शी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 840 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातही ही योजना जाहीर करण्यात आली होती.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, उद्यापासूनच खात्यावर 1500 रुपये; अर्थ खात्यातून 3490 कोटी रुपये वर्ग