Petrol-Diesel Price नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळाली. मात्र, सामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला नाही. पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर कर लावत कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 ते 2024-25 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत केंद्र आणि राज्य सरकानरं 36.58 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.  


5 वर्षात 36.58 लाख कोटींची कमाई


काँग्रेस नेते  खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पेट्रोलियम मंत्रालयाकडे मे 2019 पासून पेट्रोल आणि डिझेलवर केंद्रीय उत्पादन शुल्क, इतर कराच्या माध्यमातून सरकारनं मिळवलेल्या उत्पन्नाची माहिती मागितली होती. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी माहिती दिली आहे.  त्या माहितीनुसार 2019-20 ते आर्थिक वर्ष 2024-25 च्या  पहिल्या तिमाही म्हणजेच जून 2024 पर्यंत  केंद्र आणि राज्य सरकारनं 36 लाख 28 हजार 354 कोटी रुपये मिळवले. तर, 2019-20 ते 2023-24 पर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनं  35 लाख कोटी रुपयांची कमाई केली होती.  


पेट्रोल आणि डिझेलवरील करातून केंद्राला किती पैसे मिळतात?


पेट्रोल आणि डिझेलवरील करातून केंद्र  आणि राज्यानं 36,58,354, कोटी रुपयांची वसुली केली. यापैकी 22,21,340 कोटी रुपये  केंद्राच्या खात्यात केले आहेत. म्हणजेच जवळपास  60 टक्के रक्कम केंद्राला मिळाली. तर, राज्य सरकारनं विक्रीकर लावत   14,37,015 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच राज्यांना 40 टक्के रक्कम मिळाली. 


केंद्र आणि राज्यांची कमाई सुरु 


राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोल 94.77 रुपये प्रति लीटर मिळतंय. यामध्ये उत्पादन शुल्क, विक्रीकर सोडून डीलर्सला प्रति लीटर पेट्रोल 55.08 रुपयांना मिळतं. तर राजधानी  नवी दिल्लीत पेट्रोलची विक्री 94.77 रुपयांना केली जाते. म्हणजेच उत्पादन शुल्क, डीलरचं कमिशन आणि विक्रीकर म्हणून एका लीटरमागे 39.69 रुपये कर द्यावा लागतो. एका लीटर पेट्रोलच्या दरातून वसूल केल्या जाणारा कर जवळपास 37.24 टक्के आहे.  तर, दिल्लीत डिझेलच्या दरात कर म्हणून 32.85 टक्के रक्कम वसूल केली जाते.  


कच्च्या तेलाच्या दरात घसरण, नागरिकांना दिलासा नाहीच


सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रुड आईलचा दर 73 डॉलर प्रति बॅरलवरुन घसरुन 72.85 डॉलरवर पोहोचला आहे. तर WTI क्रुड ऑईल70  डॉलर प्रति बॅरलवरुन घसरुन 68.68 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असली तरी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळालेला नाही.  


इतर बातम्या :


PAN 2.0 प्रकल्पाद्वारे ई कार्ड मोफत मिळणार, प्रिंट हवी असल्यास पैसे भरावे लागणार, किती खर्च येणार?