Petrol Diesel Rate Today : आजचे नवे इंधन दर (Petrol Diesel Price) जारी करण्यात आले असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत. सध्या देशात सणासुदीचा काळ आहे. काही दिवसांवर दिवाळी सण आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली आहे. तर देशात गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पामतेल आयात झाली आहे. त्यामुळे येत्या सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलसह खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर (Petrol Diesel Price in Mumbai) या दरात उपलब्ध आहे. तर दिल्लीत (Petrol Diesel Price in Delhi) पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर (Petrol Diesel Price in Chennai) आहे. कोलकातामध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नसून (Petrol Diesel Price in Kolkata) पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर रुपये आहे.
शहर | पेट्रोल (रुपये / प्रति लिटर) | डिझेल (रुपये / प्रति लिटर) |
मुंबई | 106.31 | 94.27 |
दिल्ली | 96.72 | 89.62 |
चेन्नई | 102.63 | 94.24 |
कोलकाता | 106.03 | 92.76 |
कच्च्या तेलाच्या दरात तेजी
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात कपात झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात इंधन दरात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही काळात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 92.34 डॉलरवर आहे. हे दर काल प्रति बॅरल 91 डॉलरवर होते.
तुमच्या शहरातील दर तपासा
तुम्हालाही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासायचे असतील तर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. तुम्ही जर बीपीसीएलचे ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवा. पेट्रोल आणि डिझेलची किंमत तुम्हाला कळेल. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवा. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर तपासू शकता. (तुमच्या शहरांचे डीलर कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).