Petrol Diesel Price Today 17 February 2023 : भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Fuel Rates) जारी केले आहेत. आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट (Crude Oil Price) झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात. त्यानुसार, आज 17 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड तेल आणि डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. 


कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण


डब्ल्यूटीआय (WTI) कच्च्या तेलाची किंमत शुक्रवारी 0.50 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 78.10 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये (Brent Crude Oil) 0.48 टक्क्यांची घसरण झाली असून त्याची किंमत प्रति बॅरल  84.73 डॉलरवर आहे. पण कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीचा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.


Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर



  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Share Market Updates : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 340 अंकांनी तर निफ्टी 92 अंकांनी गडगडला