Petrol Diesel Price in 11 December 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत (Crude Oil) आज कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड काल 76.10 डॉलर प्रति बॅरल आणि WTI मध्ये प्रति बॅरल 71.02 डॉलरवर विकलं जात आहे. दररोज प्रमाणे आजही सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today) जारी केले आहेत. नव्या दरांनुसार, आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत यापूर्वी 22 मे रोजी देशातील चार महानगरांमध्ये झाला होता. जवळपास सहा महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, 22 मे 2022 रोजी सरकारनं उत्पादन शुल्क कमी केलं होतं, त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं.
आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.