Instant Loan : झटपट कर्जामुळे निधी तातडीने उपलब्ध होऊ शकतो, वेळेवर वित्तीय साह्य मिळून जाते, त्यासाठी कोणतीही प्रदीर्घ संमती प्रक्रिया किंवा तारणाची आवश्यकता नसते.
अनपेक्षित खर्च बऱ्याचदा तुमचं लक्ष विचलित करतात आणि तुमची आर्थिक स्थिती रुळावरून घसरू शकते. तरीच तुम्ही अशा एखाद्या स्थितीत अडकलात आणि निधीची वानवा भासल्यास, झटपट कर्ज म्हणजेच instant loan हा पर्याय हाताशी असतो.
झटपट कर्ज ही सामान्यत: छोट्या स्वरुपातील ऑनलाईन कर्ज असतात, ज्यामुळे झटपट निधी उपलब्ध होतो. काही पत पुरवठादार पूर्व-संमत ऑफरच्या स्वरूपात झटपट वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देतात. हे पतपुरवठादार तुम्हाला झटपट कर्ज उपलब्ध करुन देण्याआधी तुमच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन करतात. यामुळे कर्ज रक्कम काही तासांत प्रोसेस होऊन तिचे वाटप करण्यात येते. आपतकालीन स्थितीत हा एक सर्वोत्तम पर्याय ठरतो.
बजाज फायनान्ससारखे पत पुरवठादार Insta Personal Loans उपलब्ध करुन देतात, जे रु. 10 लाखांपर्यंतच्या पूर्व-संमत ऑफरसह मिळते. निधीचे वाटप अवघ्या 30 मिनिटे ते 4 तासांत होते. गरजेच्या काळात हा पर्याय सुयोग्य ठरतो.
झटपट कर्जाच्या काही वैशिष्ट्यांवर नजर फिरवू:
1. झटपट प्रोसेसिंग
पारंपरिक पद्धतीच्या कर्ज संमती प्रक्रिया अतिशय लांबलचक, भरमसाठ कागदपत्रांची पूर्तता तसेच क्रेडीट तपासणी असणाऱ्या होत्या. हे अतिशय वेळखाऊ प्रकरण असायचे. झटपट कर्ज प्रक्रियेत तुम्हाला मिळणारे कर्ज हे पूर्व-संमत असते. अगोदर लागणारा वेळ हा बऱ्याच अंशी कमी झालेला आहे. ज्यामुळे तणावपूर्ण वित्तीय स्थितीत तुम्हाला झटपट कर्ज उपलब्ध होते.
2. किमान ते शून्य कागदपत्रांची गरज
झटपट कर्जाकरता लागणारी कागदपत्रे थेट असतात, ती नियमित वैयक्तिक कर्ज आवश्यकतेनुसार नसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांसाठी ही कर्ज उपलब्ध होतात. काही चालू ग्राहकांना तर उत्पन्न अथवा पत्ता पुरावा अशी कोणतीही कागदपत्रे जमा करावी लागत नाहीत.
3. लवचिक परतावा पर्याय
झटपट वैयक्तिक कर्जे निरनिराळ्या परतावा पर्यायांनुसार उपलब्ध होतात. तुमच्या सुविधेप्रमाणे कर्ज परतावा कालावधीची निवड करता येते. हा कालावधी काही महीने ते काही वर्षांचा असू शकतो. तुमच्या आर्थिक गरजेचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळते आणि कर्ज परतावा स्वत:च्या सुलभतेने करता येतो.
4. तारण-मुक्त कर्जे
झटपट कर्जे ही बऱ्याचदा असुरक्षित स्वरुपातील असतात, सुरक्षित स्वरुपातील कर्जांपेक्षा अतिशय वेगळी असतात. याचा अर्थ कर्जदाराने परतावा चुकवल्यास स्वत:ची मालमत्ता गमावण्याची वेळ येत नाही. ही कर्ज तारण-मुक्त असल्याने त्यासाठी व्यक्तीला महत्त्वाची मालमत्ता सुरक्षेपोटी तारण ठेवण्याची आवश्यकता नसते.
5. पूर्व-संमत मर्यादा
कर्ज पुरवठादारांकडून ग्राहकांसाठी पूर्व-संमत वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, हे त्यांचे चालू स्वरुपातील (एक्झिस्टिंग) ग्राहक असतात. बजाज फायनान्ससारख्या काही कर्ज पुरवठादार त्यांच्या नवीन ग्राहकांना पूर्व नियुक्त मर्यादा देऊ करतात.
झटपट कर्जे हा झटपट निधी मिळवण्याचा एक सोयीस्कर मार्ग असू शकतो. तुम्हाला निधीची तातडीची गरज असल्यास, चांगला क्रेडिट स्कोअर आणि परतफेड व्यवस्थापित पद्धतीने करण्याचा विश्वास असल्यास, त्वरित कर्ज हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो.
ज्या व्यक्तिंना झटपट निधी पाहिजे, त्यांच्याकरिता बजाज फायनान्स इन्स्टा पर्सनल लोनचा पर्याय सर्वोत्तम ठरतो.तुमच्याकरिता 6 महिन्यांपासून 60 महिन्यांपर्यंतच्या परतावा कालावधीकरिता रु. 10 लाखांचे कर्ज उपलब्ध होऊ शकते.
तुमच्यासाठी असलेली ऑफर तपासण्यासाठी आजच बजाज वेबसाईट तपासा आणि काही मिनिटांत आवश्यकतेनुसार निधी मिळवा.