Post Office Recurring Deposit Scheme : भारतात सणासुदीला सोनं खरेदी (Gold Investment) करण्याची पद्धत आहे. सोने-चांदी खरेदी करणं उत्तम गुंतवणुकीचा पर्याय (Investment Option) मानला जातो. पण फक्त सोने-चांदी खरेदी गुंतवणुकीचा (Investment) उत्तम पर्याय नाही. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगली योजना शोधत असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) या योजना एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते, ज्यामध्ये प्रत्येक उत्पन्न गटासाठी गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत.


पोस्टाची भन्नाट योजना


पोस्ट ऑफिस योजना चांगल्या परताव्यासह गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची हमी मिळते. यामुळे मोठ्या संख्येने लोक भारतीय पोस्टच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना लोकप्रिय आहेत. यापैकी एक आवर्ती ठेव योजना (Post Office Recurring Deposit Scheme). तुम्ही या योजनेत फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेला राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते (RD) असंही म्हटलं जातं.


तुम्हाला किती व्याज मिळेल?


आवर्ती ठेव (RD) ही पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना आहे. या योजनेत तुमची गुंतवणूक रक्कम सुरक्षित राहते. सध्या ही पोस्ट ऑफिस स्कीम वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज देत आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून पोस्ट ऑफिसने नवे व्याजदर लागू केले आहेत. केंद्र सरकार दर तिमाहीत आपल्या बचत योजनेचे व्याजदर ठरवते.


तुम्ही 17 लाख जमा करू शकता


सध्याच्या व्याजदरानुसार, तुम्ही या योजनेत दरमहा 10,000 रुपयांची आवर्ती ठेव ठेवल्यास 10 वर्षांनंतर तुम्हाला 17 लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळेल. जर तुम्ही दरमहा 10,000 रुपये जमा केले तर एका वर्षात तुम्हाला 1 लाख 20 हजार रुपये जमा होतील. त्याचप्रमाणे, तुम्हाला या योजनेत 10 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही 12,00,000 रुपये गुंतवणूक म्हणून जमा कराल. यानंतर, योजनेच्या मुदतीनंतर, तुम्हाला परतावा म्हणून 5,08,546 रुपये मिळतील. अशा प्रकारे, तुम्हाला 10 वर्षांनंतर एकूण 17,08,546 रुपये मिळतील.


योजनेवर कर्जही मिळेल


या बचत योजनेत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. पालक त्यांच्या अल्पवयीन मुलाचे खाते देखील उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधाही मिळते. जर तुम्ही या योजनेत 12 हप्ते जमा केले तर तुम्हाला बँकांकडून कर्ज मिळू शकते. ही योजना तुम्ही जमा केलेल्या एकूण रकमेच्या 50 टक्के कर्ज म्हणून घेऊ शकता.