मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation) म्हणजेच एलआयसीच्या (LIC) हा गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि विश्वसनीय पर्याय आहे. एलआयसी गुंतवणूकदारांसाठी वेळोवेळी विविध योजना आणत असते. देशभरातील सर्व स्तरातील लोक आपल्या इच्छेप्रमाणे आणि सोयीस्कररित्या यापैकी गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. एलआयसीच्या अशाच एका शानदार योजनेमध्ये तुम्हांला गुंतवणूक करण्याची संधी आहे. एलआयसी धन वृद्धी योजना (LIC Dhan Vriddhi Plan) ही एक उत्तम योजना आहे. ही एक सिंगल प्रीमियम योजना (Single Premium Plan) आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 


एलआयसीने ही एलआयसी धन वृद्धी योजना 23 जून 2023 रोजी सुरू केली होती. एलआयसी धन वृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे या शानदार योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची संधी सोडू नका. जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या योजने संबंधित सविस्तर माहिती जाणून घ्या.


काय आहे एलआयसी धन वृद्धी योजना?


एलआयसी (LIC) धन वृद्धी योजना ही नॉन-लिंक केलेली, नॉन-पार्टिसिपेट, वैयक्तिक, बचत आणि सिंगल प्रीमियम योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला सुरक्षा आणि बचत या दोन्हींचा एकत्र फायदा मिळेल. तसेच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास या योजनेमुळे कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल. जर पॉलिसीधारक हयात असेल तर, तुम्हाला मुदतपूर्तीवर निश्चित रकमेचा लाभ मिळतो. 


एलआयसी धन वृद्धी योजनेत दोन पर्याय


एलआयसी धन वृद्धी योजनेमध्ये गुंतवणूकदारांना दोन पर्याय मिळतात. ही पॉलिसी 32 ते 60 वर्षांच्या वयोगटातील व्यक्ती खरेदी करू शकतात. पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला 1.25 पट पर्यंत विमा रकमेचा पर्याय मिळेल. दुसऱ्या पर्यायामध्ये, गुंतवणूकदाराला विम्याच्या 10 पट रक्कम मिळू शकते. ही रक्कम मृत्यूनंतर लाभाच्या  (Death Benefit)स्वरूपात मिळू शकते. तुम्ही ही पॉलिसी 10 वर्षे, 15 वर्षे किंवा 18 वर्षांसाठी खरेदी करू शकता. मुदतपूर्तीच्या वेळी, पॉलिसीला मूळ विम्याच्या रकमेसह अनेक अतिरिक्त फायदे मिळतात.


कर सूट आणि कर्ज सुविधा


या योजनेत गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. यासोबतच, जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर, तुम्ही एलआयसी धन वृद्धी प्लॅनवर कर्ज देखील मिळवू शकता. तुम्हालाही ही पॉलिसी घ्यायची असेल तर, ऑफलाइन गुंतवणुकीसाठी एजंटशी संपर्क साधा. याशिवाय, तुम्ही ही योजना कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटरमधून देखील खरेदी करु शकता. ऑनलाइन खरेदी करण्यासाठी, LIC च्या अधिकृत वेबसाइट www.licindia.in ला भेट द्या.