Banking Charges : बँकांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर बँकांकडून शुल्क (Bank Charge on Services) आकारले जाते. बँका आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन (Offline and Online Banking) पद्धतीने सेवा देतात. त्यातील काही सेवा मोफत असून काही सेवांसाठी बँका ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारतात. 


>> बँकांच्या या सेवा असतात मोफत 


बँकांकडून आपल्या ग्राहकांना सध्या मोफत एटीएम कार्ड, चेकबुक, ऑनलाइन सेवा मोफत दिल्या जातात. काही सेवांसाठी ग्राहकांकडून शुल्क घेतले जाते. 


काही बँका आपल्या ग्राहकांना बेसिक सर्व्हिसबाबत माहिती देतात. यामध्ये बँकांकडून कोणताही बदल केल्यास तो ग्राहकांना याची माहिती दिली जाते. ग्राहकांना बँकेच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल अॅप्सवर याची पूर्ण माहिती मिळू शकते. 


>> या सेवांसाठी बँकांकडून शुल्क


- जर तुम्ही तुमच्या खात्यात किमान रक्कमेपेक्षाही कमी रक्कम असल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो
- डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क द्यावे लागते.
- चेकबुक सातत्याने जारी करणे अथवा चेक न वटल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागेल. 
- तुमच्या बँक खात्यातून इतर खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला त्या प्रमाणात शुल्क लागू शकते.
- होम बँकिंग सुविधेसाठी शुल्क भरावे लागू शकते. 
- जर तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला प्रोसेसिंग शुल्क, डॉक्युमेंटेशन चार्ज, अर्जाचे शुल्क आणि कायदेशीर शुल्क भरावे लागतील. 
- कर्जासाठी तुम्हाला काही कागदपत्रे बँकांकडे जमा करावे लागतात. तुम्ही त्यांच्या नक्कल प्रतीसाठी (Duplicate Copy) अर्ज करत असाल तर त्यावर काही शुल्क लागू शकते.
- जर, तुम्ही निश्चित व्याज दरावर कर्ज घेतले आणि कर्ज परतफेडीची मुदत संपण्याआधी तुम्ही संपूर्ण कर्ज फेडल्यास तुम्हाला काही शुल्क द्यावे लागतील.
- बँकांमध्ये तुम्ही लॉकरची सुविधा घेतल्यास, तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल. 
- तुम्ही परदेशात असताना डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. 
- बँकेमधून डिमांड ड्राफ्ट बनवणे आणि अधिक पानांचे चेकबुक घेतल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागेल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: