HDFC Life Click 2 Retire : सेवानिवृत्ती म्हटली की मनात एक शांत, सुखी चित्र उभं राहतं. आठवणींनी भरलेलं घर, गजराविना सुरू होणाऱ्या सकाळ आणि संध्याकाळी कुटुंबासोबत घालवलेला वेळ. पण अनेक पगारदार व्यावसायिकांसाठी, विशेषतः 50 वर्षांच्या आसपास पोहोचणाऱ्यांसाठी, वास्तव थोडं वेगळं असतं. हळूहळू पण सतत त्यांची बचत कमी करणारी एक ‘गळती’ असते आणि ती लक्षात येईपर्यंत अनेकदा उशीर झालेला असतो.

Continues below advertisement

ही गळती होते तीन लपलेल्या कारणांमुळ. महागाई, वैद्यकीय खर्चातील वाढ, आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या.

महागाई : शांतपणे झिजवणारा शत्रू

Continues below advertisement

20 वर्षांपूर्वी ₹15 ला मिळणारी पावाची लादी आज जवळपास ₹ 40 ला मिळते. अशीच परिस्थिती जवळजवळ सर्व आवश्यक वस्तूंमध्ये दिसते. महागाई कधीच अचानक धक्का देत नाही. ती हळूहळू वाढत जाते आणि काही दशकांनंतर तुमच्या बचतीची अर्धी किंमत घालवू शकते, जर ती लक्षात न घेतली गेली तर.

वैद्यकीय खर्च : उत्पन्नापेक्षा जलद वाढणारा भार

सेवानिवृत्तीनंतर (Retirement) आरोग्य हा सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरतो. विमा असला तरी तपासण्या, औषधे आणि सल्लामसलती यांचे खर्च खिशातूनच करावे लागतात. भारतात वैद्यकीय महागाई ही सर्वसाधारण महागाईपेक्षा (Inflation) जास्त वेगाने वाढते, म्हणजेच आरोग्यासाठी निवृत्तीतील बचतीचा मोठा भाग खर्च होण्याची शक्यता वाढते.

अवलंबित : अनपेक्षित जबाबदारी

अनेक भारतीय पालकांना आपल्या मुलांना उच्च शिक्षण, विवाह किंवा घरासाठी आर्थिक मदत करत राहावे लागते. त्यात वृद्ध आई-वडिलांची काळजी आणि खर्च यांची भर पडल्यावर, तुमची साठवलेली बचत अपेक्षेपेक्षा लवकर कमी होऊ शकते.

गळती थांबवायची कशी?

उत्तर आहे - लवकर आणि सुयोग्य नियोजन. सेवानिवृत्ती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, तडजोड नव्हे. महागाई, वैद्यकीय खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन मजबूत निवृत्ती निधी तयार करणे आवश्यक आहे.

यासाठी विमा-आधारित निवृत्ती योजनांचा विचार करता येईल, ज्या सुरक्षिततेसोबत वाढीची संधीही देतात.

उदाहरणार्थ, HDFC Life Click 2 Retire ही योजना पगारदार व्यावसायिकांसाठी खास डिझाइन केलेली आहे. फक्त ₹2000 प्रतिमहिना पासून तुम्ही तुमच्या निवृत्ती नियोजनाची सुरुवात करू शकता — अगदी ४०व्या वर्षानंतरही. या योजनेत तुम्हाला Assured Vesting Benefit मिळतो आणि त्याचवेळी बाजारातील वाढीचा फायदा घेण्याची संधीही. म्हणजेच सुरक्षा आणि वाढ यांचा समतोल.

सेवानिवृत्ती ही बचत कमी होत असल्याची भीती निर्माण करणारी वेळ नसावी. योग्य नियोजन केल्यास ती स्वातंत्र्य, सन्मान आणि आनंदाने भरलेले जीवन जगण्याची संधी ठरू शकते.