निवृत्ती घेतल्यानंतरचं जीवन हे जीवनातील धावपळ कमी करण्याचा, प्रवास करण्याचा आणि आपण आयुष्यभर केलेल्या कष्टानं जे कमावलं त्याचा आनंद घेण्याचा काळ आहे असे अनेकदा वाटते. पण अनेकांसाठी, सध्या एक महत्त्वाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, तो म्हणजे आता मला नियमित पगार मिळत नसल्यामुळे, मी माझी मालमत्ता किंवा संपत्ती कशी वाढवत राहावी? याचे उत्तर सुरक्षितता, स्थिर वाढ आणि तरलता यांचा समतोल साधणाऱ्या स्मार्ट आर्थिक नियोजनात लपलेले आहे.
निवृत्तीनंतरही मालमत्ता किंवा संपत्ती निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आयुष्य 60 किंवा 65 व्या वर्षी थांबत नाही; अनपेक्षित खर्च, वाढता वैद्यकीय खर्च आणि प्रवास किंवा कुटुंबाला आधार देण्यासारखी जीवनशैलीची उद्दिष्ट्ये यामुळे बचतीवर ताण येऊ शकतो.यामधील पहिली पायरी नेहमी हीच असते ती म्हणजे तुमच्याकडे एक भक्कम आपत्कालीन निधी असल्याची खात्री करावी. हीच ती आर्थिक सुरक्षा आहे, जी अनपेक्षितपणे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीला हात लावण्यापासून वाचवते. साधारणपणे , तुमच्या आपत्कालीन बचतीमध्ये किमान सहा ते बारा महिन्यांच्या खर्चाची रक्कम असणं अपेक्षित आहे आणि ती सहज उपलब्ध होणारी असावी, जसे की बचत खात्यात किंवा लिक्विड फंडात असावी.
तुम्हाला अनपेक्षित परिस्थितीमधील गरजांसाठी लागणाऱ्या खर्चासाठीच्या फंडाची पूर्तता झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे रचनात्मक निवृत्तीसाठीची योजना होय. या योजना शिस्तबद्ध बचतीची सोय करण्यासोबतच तुमची संपत्ती वाढवण्याची संधीही देतात. सुरक्षा आणि लवचिकता दोन्ही देणारी योजना निवडणे हीच यातली मुख्य गोष्ट आहे. नियमित योगदान, अगदी लहान रक्कम असली तरी, कालांतराने त्याचं रुपांत मोठ्या रकमेत होऊ शकतं आणि काही निवृत्ती योजनांची रचना अशा प्रकारे केलेली असते की तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षापासूनच सुरुवात करू शकता, जेणेकरून तुम्ही निवृत्तीनंतरच्या मालमत्तेची उभारणी त्वरित सुरू करू शकाल.
एचडीएफसी लाइफ क्लिक २ रिटायरसारखी (HDFC Life Click 2 Retire) प्रोडक्ट निवृत्त व्यक्तींना कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रक्रिया किंवा छुपे खर्च न करता आपली संपत्ती वाढवण्याचं काम सोपे करतात. तुम्ही निवृत्ती योजनेत 2000 रुपये प्रतिम महिना याप्रमाणं गुंतवणूक करु शकता. या योजनेतील लवचकितेमुळं तुम्ही तुमचं नियमित जीवन विचलित न करतागुंतवणूक करण्याची संधी मिळते. अतिरिक्त बाबींचा विचार केला असता या योजनेत कोणतेही प्रवेश शुल्क, पॉलिसी व्यवस्थापन खर्च, पॉलिसीतून बाहेर पडण्याचं शुल्क नसेल. या योजनेत तुमचा रुपया गुंतवला जाऊ शकतो.
याचे फायदे केवळ शिस्तबद्ध बचतीपुरते मर्यादित नाहीत. एचडीएफसी लाइफ क्लिक २ रिटायर एक खात्रीशीर वेस्टिंग लाभ देते. जे तुमची सेवानिवृत्तीची रक्कम सुरक्षित करते आणि त्याच वेळी तुम्हाला बाजारातील वाढीचा फायदा घेण्याची संधी देखील देते. आणि जर काही अनपेक्षित घडलं, तर ही योजना पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला मृत्यू लाभ देते, त्यावेळचे फंडाचे मूल्य किंवा भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105% जे अधिक असेल ते नॉमिनीला दिलं जातं.
निवृत्तीचा काळ म्हणजे केवळ जुन्या बचतीवर अवलंबून राहण्याचा काळ राहिलेला नाही; हा एक असा टप्पा आहे जिथे विचारपूर्वक केलेले नियोजन तुम्हाला मालमत्ता निर्माण करणे सुरू ठेवण्यास, आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्यास आणि तुमच्या स्वतःच्या अटींवर जीवन जगण्यास मदत करू शकते. आपत्कालीन खर्चासाठीच्या निधीची तरतूद करून आणि सुनियोजित निवृत्ती योजनांमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की तुमची निवृत्तीनंतरची वर्षे केवळ आरामदायीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी देखील असतील.
Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.