मुंबई: नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (EPF) म्हणजे केवळ बचत नव्हे तर गरज भासल्यास आर्थिक आधार देखील आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) काही ठराविक कारणांसाठी खातेदारांना त्यांच्या खात्यातून अंशतः किंवा पूर्ण रक्कम काढण्याची सुविधा देते. घरखरेदीपासून लग्न आणि बेरोजगारीपर्यंत, या योजनेंतर्गत विविध गरजांसाठी निधी मिळू शकतो.

पीएफ पोर्टल तसेच KYC पूर्ण असेल तर UMANG अ‍ॅपवरून देखील सहजपणे पीएफ क्लेम करता येतो. पण हे पैसे काढण्यासाठी काही अटी आणि मर्यादा आहेत. जाणून घेऊयात कोणत्या परिस्थितीमध्ये आणि किती पैसे काढता येतात.

PF For New House : घर खरेदी किंवा नवीन बांधकाम

- नोकरीत किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

- खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या 90 टक्केपर्यंत पैसे काढण्याची मुभा.

- ही सुविधा आयुष्यात फक्त एकदाच वापरता येते

घराच्या दुरुस्तीसाठी रक्कम

- जर तुमचे घर हे पाच वर्षे जुने असेल आणि त्याची दुरुस्ती करायची असेल तर पीएफ काढता येतो.

- 12 महिन्यांचा मूळ पगार + महागाई भत्ता (DA) एवढी रक्कम काढता येते.

- यासाठी स्व-घोषणापत्र सादर करणे गरजेचे असते.

मुलांचे शिक्षण किंवा लग्नासाठी आर्थिक खर्च

- मुलांचे किंवा भावंडांचे लग्न किंवा उच्च शिक्षण यासाठी पीएफमधून पैसे काढता येतात.

- खातेदाराच्या वाट्याचा 50 टक्क्यांपर्यंत निधी मिळतो

- यासाठी नोकरीत 7 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

Online Claim Of EPF : बेरोजगारीच्या काळात आर्थिक आधार

- एक महिना बेरोजगार असाल तर एकूण शिल्लक रकमेच्या 75 टक्के रक्कम काढता येते.

- दोन महिने किंवा अधिक बेरोजगारी असल्यास उर्वरित 25 टक्के रक्कमही काढता येते आणि खाते बंद करता येते.

How To Withdraw Money From PF Account : पैसे कसे काढावे?

- EPFO पोर्टल किंवा UMANG अ‍ॅपद्वारे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.

- UAN नंबर सक्रिय असावा आणि KYC पूर्ण झालेले असावे (Aadhaar, PAN, बँक खाते लिंक).

- वैद्यकीय आणीबाणीसाठी त्वरित पैसे मिळण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

Processing Time For EPF : पैसे किती दिवसात खात्यात येतात?

ऑनलाइन क्लेम प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 5 ते 50 दिवस लागतात. मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.

नोकरी करताना पूर्ण पीएफ रक्कम काढता येते का?

नाही. नोकरी चालू असताना केवळ ठराविक कारणांसाठीच अंशतः रक्कम काढता येते. संपूर्ण पीएफ रक्कम फक्त निवृत्ती किंवा दोन महिन्यांहून अधिक बेरोजगारी नंतर काढता येते

नोकरी बदलल्यावर काय करावे?

नोकरी बदलल्यास पीएफ रक्कम काढू नये, तर नवीन नोकरीच्या खात्यात ट्रान्सफर करावी. यामुळे तुमचा एकूण सेवा कालावधी जपला जातो आणि कर लाभ मिळवणे सोपे होते.

पैसे काढण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागतो?

ऑनलाइन अर्ज करताना, सिस्टम स्वतःहून योग्य फॉर्म निवडते. उदाहरणार्थ: फॉर्म 31 अंशतः पैसे काढण्यासाठी.

EPFO द्वारे वेळोवेळी नियम बदलले जातात. त्यामुळे अधिकृत वेबसाइट (https://www.epfindia.gov.in) वर तपशीलवार माहिती तपासावी.