EPFO Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees' Provident Fund Organisation) खात्यात मागील आर्थिक वर्षीचे व्याज अद्यापही जमा न झाल्याने खातेधारकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. मात्र, या गोंधळावर भविष्य निर्वाह निधी संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे. ईपीएफ खातेधारकांच्या (EPFO Account) पीएफवर लवकरच व्याज जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सोमवारपासून (31 ऑक्टोबर 2022) 2021-22 या वर्षातील व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जमा करण्यात आलेले व्याज लवकरच लाभार्थ्यांच्या UAN/EPFO खात्यांमध्ये दिसून येणार असल्याचे ईपीएफओकडून सांगण्यात आले आहे.
मागील आर्थिक वर्षातील व्याज जमा न झाल्याने पीएफ खातेधारकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. एकाने EPFO ला ट्वीटरवर याबाबत प्रश्न विचारला. त्यावर ईपीएफओने व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले. लवकरच व्याज जमा करण्यात येणार असून पूर्ण रक्कम दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
व्याज जमा होण्यासाठी उशीर का?
ईपीएफओकडून व्याज जमा करण्यासाठी उशीर झाला आहे. सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात येत असल्याने अद्याप व्याजाची रक्कम जमा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
व्याज दर किती?
आर्थिक वर्ष 2021-22 या वर्षासाठी केंद्र सरकारने ईपीएफ खात्यातील जमा रक्कमेवर 8.1 टक्के इतका व्याज देण्याचे जाहीर केले होते. याचा फायदा ईपीएफओच्या पाच कोटी सभासदांना होणार आहे.
ईपीएफओ खात्यातील रक्कम अशी पाहा
उमंग अॅप: उमंग अॅपच्या माध्यमातून तुम्ही पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता. या अॅपच्या माध्यमातून विविध सेवांचा वापर करता येऊ शकतो. अॅपवर ईपीएफ पासबुक पाहणे, दावे दाखल करणे, दाव्याची स्थिती याबाबतची माहिती मिळते. उमंग अॅप डाऊनलोड करून आपला फोन नंबर नमूद करून रजिस्ट्रेशन पूर्ण करता येते.
EPFO वेबसाइट: EPFO वेबसाइटवर, कर्मचार्यांसाठी या विभागात ‘Member Passbook’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून तुम्ही PF पासबुक पाहू शकता.
इतर महत्त्वाच्या बातम्या: