Aadhaar Card Last Date for Free Update : आधार कार्ड हे भारतीयांसाठी एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. आधार कार्ड शिवाय अनेक सरकारी आणि खाजगी कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. त्याचबरोबर आधार कार्डमध्ये जुनी माहिती असेल आणि ती अपडेट केली नसेल तर तुमचं कामंही अडकू शकतं. याशिवाय आधार अपडेट न केल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हीही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितलं होतं. UIDAI आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत देत आहे. जर तुमच्याकडे 10 वर्ष जुने आधार कार्ड असेल तर तुम्ही तुमचं कार्ड ताबडतोब अपडेट करुन घ्या. मुदत संपल्यानंतर तुम्ही आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील.


आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख


केंद्र सरकारने 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. जर तुमचं आधार कार्ड 10 वर्ष जुनं असेल आणि अद्याप तुम्ही ते अपडेट केलं नसेल, तर वेळ वाया घालवू नका. आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावं लागेल. UIDAI वेबसाइटवर तुम्ही ऑनलाईन अपडेट करू शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या आधार केंद्राला भेट देऊनही तुमचं आधार कार्ड मोफत अपडेट करु शकता. यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर आहे. त्यानंतर आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला पैसे मोजावे लागतील, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, आजच तुमचं आधार कार्ड अपडेट करुन घ्या.


आधार कार्ड कुठे अपडेट करायचं?


आधार दोन प्रकारे अपडेट करता येतो. हे काम तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करता येईल. यासाठी तुम्हाला आधार केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊ शकता. तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता, ज्यामुळे तुम्हाला लांब रांगेत ताटकळत थांबावं लागणार नाही. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही आधार कार्ड अपडेटसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता.


आधार कार्डची 'ही' सर्व माहिती मोफत अपडेट होईल


UIDAI आधारमध्ये काही गोष्टी अपडेट करण्यासाठी शुल्क आकारलं जातं. पण, 14 डिसेंबर 2023 पर्यंत या गोष्टी अपडेट करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. 



  • 5 वर्षे, 15 वर्षे आणि 17 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीचे बायोमेट्रिक आधार अपडेट करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते.

  • डेमोग्राफिक डेटासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.

  • बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल.

  • डेमोग्राफिक डेटा ऑनलाइन अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क

  • आधार डाउनलोड आणि कलर प्रिंटवर 30 रुपये शुल्क

  • ओळख आणि पत्त्याची कागदपत्रे अपडेट करण्यासाठी 25 रुपये शुल्क

  • पिन आधारित पत्ता अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क


दरम्यान, आधार कार्डमधील वर दिलेले सर्व अपडेट 14 डिसेंबरपर्यंत मोफत करण्यात येणार आहे, त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Aadhaar Card : तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही, झटपट तपासा; स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या