Paytm IPO : देशातील सर्वात मोठा IPO हा PayTM चा IPO ठरणार आहे. PayTM चा आयपीओ सोमवारपासून खुला होणार आहे. मागील काही महिन्यांपासून गुंतवणूकदार या आयपीओची प्रतिक्षा करत होते. आता ही प्रतिक्षा संपली असून 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान या आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. PayTM आयपीओद्वारे 18 हजार 300 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. 


या आयपीओद्वारे 8300 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करण्यात येणार आहेत. तर, 10 हजार कोटी रुपयांचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) विक्री करण्यात येणार आहे. पेटीएमने बुधवारी अँकर इन्वेस्टर्सकडून 8235 कोटी उभारले. 


पेटीएम आयपीओची महत्त्वाची माहिती


- पेटीएम आयपीओ 8 नोव्हेंबर रोजी खुला होणार
-10 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार
- 2080-2150 रुपये प्राइस बँड असणार आहे 
- लॉट साइज ही 6 शेअरची असणार आहे
- किमान गुंतवणूक 12 हजार 480 रुपये असणार आहे
-इश्यू साइज 18 हजार 300 कोटी रुपये


ग्रे मार्केटमधील दर काय?
शेअर बाजार तज्ज्ञांनुसार ग्रे मार्केटमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहे.  ग्रे मार्केटमध्ये पेटीएमचा आयपीओ जवळपास 140 रुपये प्रीमियम दाखवत आहे. याचाच अर्थ पेटीएमचा शेअर 2300 रुपयांहून अधिक किंमतीत लिस्ट होऊ शकतो.


तज्ज्ञ काय म्हणतात? 
गोल्डमॅन सॅक्स इंडिया सिक्योरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन रामकृष्ण यांनी IPO बाबत माहिती देताना म्हटले की, प्राइस बँड 2080 रुपयांपासून ते 2150 रुपये प्रति शेअर इतका ठरवण्यात आला आहे. 


एका वृत्तानुसार, कंपनी आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर हा सध्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी करणार आहे. त्याशिवाय नवीन व्यवसाय आणि ग्राहकांना जोडण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. 


संबंधित वृत्त :


'या' दोन शेअर गुंतवणूकदारांना झाला बंपर फायदा; 8 कंपन्याच्या मार्केट कॅपिटलमध्ये 1.18 लाख कोटींनी वाढ


Paytm : आयपीओ आधीच पेटीएमची दिवाळी! गुंतवणूकदारांकडून जमवले 8235 कोटी रुपये