Patanjali Ayurveda: भारतीय बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचा दावा पतंजली आयुर्वेदनं केला आहे.ज्यावेळी अधिक कंपन्या नफा आणि बाजारातील भागीदारीच्या शर्यतीत आहेत. त्यावेळी पतंजलीनं स्वत: ला एक मिशनप्रमाणे पुढं आणल्याचं म्हटलंय. कंपनीच्या मते त्यांचा प्रमुख उद्देश केवळ व्यापार किंवा व्यवसाय करणं नसून पूर्ण पारदर्शकपणे आणि समर्पणासह देशहित साधने हा आहे.
व्यापारात नैतिकता आणि राष्ट्रीयत्व असावं: रामदेव
पतंजलीनं म्हटलं की, कंपनीचे संस्थापक योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या मते व्यापारात नैतिकता आणि राष्ट्रवाद आवश्यक आहे. पारदर्शक मिशन द्वारे कंपनीनं हे निश्चित केलंय की ग्राहकांना हे कळावं की ते काय वापरत आहेत. उत्पदानांची गुणवत्ता ते किंमत ठरवण्यापर्यंत पंतजलीनं बहूराष्ट्रीय कंपन्यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिलं आहे. सामान्य भारतीयांना किफायतशीर पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
स्वदेशीला केंद्रबिंदू मानून काम
पतंजलीच्या कामाचा केंद्रबिंदू स्वदेशी आहे. कंपनीच्या मते जेव्हा देशात बनवलेल्या वस्तूंचा उपयोग वाढतो तेव्हा थेट फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होता. पतंजली आपला कच्चा माल थेट भारतीय शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यावर जोर देते. यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळतं. कंपनीच्या आणखी एका दाव्यानुसार व्यापारातून होणाऱ्या लाभाचा एक मोठा वाटा संपत्ती निर्माण करण्याऐवजी धर्मादाय, शिक्षण, गौसेवा आणि योग प्रचार प्रसारासाठी लावला जातो.
अंतिम ध्येय समृद्ध आणि निरोगी भारत
पतंजलीनं म्हटलं की संशोधन क्षेत्रात देखील कंपनीनं हरिद्वारमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्यातून आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाच्या मानकांवर सिद्ध करता यावं. टीकेनंतरही पतंजलीनं त्यांचं अंतिम ध्येय समृद्ध आणि निरोगी भारत असल्याचं म्हटलंय. पंतजलीचं हे मॉडेल कॉर्पोरेट विश्वासाठी एक केस स्टडी आहे. ज्यातून हे दिसून येतं की कशा प्रकारे अध्यात्मिक मूल्य आणि राष्ट्रीयत्वाला सोबत यशस्वी ब्रँड निर्माण केला जाऊ शकतो.