Patanjali ERP System : पतंजली समूहाने भारतीय बँकिंग क्षेत्रात आपला धोरणात्मक प्रवेश जाहीर करत ‘भारुवा सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (BSPL)’ या आपल्या तंत्रज्ञान शाखेद्वारे एआय-आधारित, बहुभाषिक 360° बँकिंग ईआरपी प्रणाली सादर केली आहे. हे व्यासपीठ प्रामुख्याने प्रादेशिक, सहकारी आणि लघु वित्तीय संस्थांसाठी तयार करण्यात आले असून, त्यांना डिजिटल बँकिंगच्या दिशेने एक सशक्त पाऊल उचलण्याची संधी देणार आहे. भारुवाचे ‘बी-बँकिंग’ प्लॅटफॉर्म बँकिंग क्षेत्रातील चार मोठ्या समस्यांवर समाधान देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे.
1. भाषिक समावेशकता
भारतातील बहुभाषिकतेच्या पार्श्वभूमीवर बँकिंग सेवा प्रामुख्याने इंग्रजीपुरती मर्यादित आहेत. ‘बी-बँकिंग’ द्विभाषिक सेवा प्रदान करून स्थानिक भाषांतील व्यवहार सुलभ करतो. उदाहरणार्थ, गुजरातमध्ये गुजराती, तर पंजाबमध्ये पंजाबी भाषेतील सेवा सहज उपलब्ध होतात.
2. वाढलेली सुरक्षा
या प्लॅटफॉर्ममध्ये अत्याधुनिक एआय व सायबर सुरक्षा प्रणालीचा समावेश असून, डेटा व व्यवहारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं गेलं आहे.
3. कार्यक्षमता
एपीआय बँकिंग, एमआयएस, एचआरएमएस, ईआरपी मॉड्यूल्स, एएमएल टूल्स, आणि वर्कफ्लो ऑटोमेशनसह अनेक बँकिंग प्रक्रिया ‘बी-बँकिंग’ मध्ये समाविष्ट आहेत.
4. नियामक अनुपालन
1963 च्या अधिकृत भाषा कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, हे सोल्यूशन द्विभाषिक सॉफ्टवेअरच्या सरकारी आदेशांना पूर्णपणे अनुसरते.
भारताच्या सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर – आचार्य बालकृष्ण
पंतजलि समूहाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की, "भारत हा भाषिकदृष्ट्या विविध देश असूनही, आपली बँकिंग प्रणाली प्रामुख्याने इंग्रजीवर अवलंबून आहे. यामुळे लाखो लोक या व्यवस्थेपासून वंचित राहतात. ‘भारुवा’ हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत, भाषिकदृष्ट्या समावेशक आणि कार्यक्षमतेने भरलेलं सोल्यूशन आहे, जे देशाच्या खऱ्या डिजिटल समावेशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे." तसेच, ‘भारुवा’ने नॅचरल सपोर्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. सोबत भागीदारी केली असून, ही कंपनी 1999 पासून देशभरातील 5,000 हून अधिक बँक शाखांना ऑटोमेशन सोल्यूशन्स पुरवते.
BSPL बीएसपीएलचे उद्दिष्ट काय?
BSPL आणि Natural Support यांच्या संयुक्त पुढाकाराचे उद्दिष्ट म्हणजे एकात्मिक Core Banking System (CBS) सह सर्वसमावेशक 'बँक इन अ बॉक्स' सोल्यूशन पुरवणे. यामध्ये इंटरनेट व मोबाइल बँकिंग, ई-केवायसी, पीएफएमएस इंटिग्रेशन, एएमएल, एमआयएस, डीएसएस, एचआरएमएस, ईआरपी अशा सर्व मॉड्यूल्सचा समावेश आहे. ही प्रणाली विशेषतः राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, शहरी सहकारी बँका, एनबीएफसी आणि इतर लघु वित्तीय संस्थांसाठी तयार करण्यात आली आहे – ज्या बहुभाषिक सेवा आवश्यक असलेल्या प्रदेशांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवू इच्छितात.
आणखी वाचा
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब, भारतीय आयुर्वेदिक कंपन्यांची जगभरात आरोग्य क्षेत्रात क्रांती