PAN Card मुंबई : दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये (Documents) पॅन कार्डचा समावेश होतो. पॅन कार्ड (Pan Card) नसल्यास अनेक कामे करणे कठीण होते. त्यामुळे तुम्हाला तुमचे पॅन कार्ड अपडेट ठेवणे आवश्यक आहे. अनेक वेळा पॅन कार्डमध्ये नाव चुकलेले असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
मात्र आता तुम्हाला आता पॅन कार्डमध्ये नावात बदल करण्यासाठी सरकारी दफ्तरी जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून पॅन कार्डमध्ये नावात बदल करू शकतात. तुम्हालाही तुमच्या पॅन कार्डमध्ये तुमचे नाव अपडेट करायचे आहे का? मग आम्ही तुम्हाला आज त्याची ऑनलाईन प्रक्रिया सांगणार आहोत.
जाणून घ्या सोप्या स्टेप्स
- सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर (Income Tax Department) जावे लागेल.
- त्यानंतर ऑनलाइन सेवा (Online Services) टॅबवर क्लिक करा.
- पॅन सेवेच्या अंतर्गत पॅन कार्ड पुनर्मुद्रण/दुरुस्ती/पत्त्यात बदलाची विनंती (Request for PAN Card Reprint/Correction/Change of Address) अशा टॅबवर क्लिक करा.
- ऑनलाइन अर्ज करा (Apply Online) हा पर्याय निवडा.
- तुमचा पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि लिंग (PAN Number, Date of Birth, Gender) टाईप करा.
- मी रोबोट नाही (I am not a Robot) चेकबॉक्सवर क्लिक करा.
- सबमिटवर (Submit) क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल ज्यात तुम्हाला तुमच्या नावातील दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती टाईप करावी लागेल.
काळजीपूर्वक नाव टाईप करा
- Your Current Name : हे तुमचे सध्याचे नाव आहे जे तुमच्या पॅन कार्डवर चुकीचे लिहिलेले आहे.
- Your Correct Name : जे नाव तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर प्रिंट करायचे आहे. ते टाईप करा.
सर्व माहिती टाईप केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. तुम्ही केलेल्या कृतीची तुम्हाला एक पोचपावती क्रमांक मिळेल. हा पोचपावती क्रमांक जपून ठेवा. कारण तुम्हाला भविष्यातील संदर्भासाठी त्याची गरज भासेल. तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर होण्यासाठी 15-20 दिवस लागू शकतात. एकदा तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला एक नवीन पॅन कार्ड मिळेल ज्यावर तुमचे योग्य नाव छापून येईल.
...तर मिळणार कारणे दाखल नोटीस
लक्षात घ्या की तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर न झाल्यास, तुम्हाला कारणे दाखवा नोटीस मिळेल. ही नोटीस तुमची नाव बदलण्याची विनंती नाकारण्याचे कारण देईल. तुम्ही या कारणांशी सहमत नसल्यास, तुम्ही त्यांना अपील करू शकतात.
ऑफलाईन नाव बदलण्यासाठी काय करावे.
जर तुम्हाला नाव बदलण्याची विनंती ऑनलाइन करायची नसेल, तर तुम्ही ऑफलाइन देखील नाव बदलण्याची विनंती करू शकतात.
खालील स्टेप्स फॉलो करा
- आयकर विभागाच्या वेबसाइटवरून पॅन कार्ड सुधारणा फॉर्म डाउनलोड करा.
- फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
- तुमच्या जवळच्या पॅन कार्ड जारी करणार्या प्राधिकरण (PCIA) कार्यालयात फॉर्म सबमिट करा.
- PCIA तुमची नाव बदलण्याची विनंती 15-20 दिवसात मंजूर किंवा नाकारेल. एकदा तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला एक नवीन पॅन
- कार्ड मिळेल ज्यावर तुमचे योग्य नाव छापलेले असेल.
नावात बदल करण्यासाठी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक
- पॅन कार्ड : हे तुमचे सध्याचे पॅनकार्ड असून त्यावर चुकीचे नाव छापलेले आहे.
- आधार कार्ड : हे तुमचे आधार कार्ड आहे जे तुमच्या योग्य नावाचा पुरावा आहे.
- विवाह प्रमाणपत्र : जर तुम्ही लग्नानंतर तुमचे नाव बदलले असेल तर तुम्हाला तुमचे विवाह प्रमाणपत्र जोडावे लागेल.
- घटस्फोट प्रमाणपत्र : घटस्फोट झाला असेल आणि त्यानंतर तुम्ही जर तुमचे नाव बदलले असेल तर तुम्हाला घटस्फोटाचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.
- न्यायालयाचा आदेश : जर तुम्ही तुमचे नाव कायदेशीररित्या बदलले असेल तर तुम्हाला संबंधित न्यायालयाचा आदेश जोडावा लागेल.
इतकी असणार फी
नाव बदलण्याचे शुल्क 100 रुपये आहे. जर तुम्ही ऑनलाईन नाव बदलण्याची विनंती केली तर तुम्ही हे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरू शकता. जर तुम्ही ऑफलाइन नाव बदलण्याची विनंती केली तर तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे फी भरावी लागेल.
आणखी वाचा
तुम्ही नवीन घराची खरेदी कशी केलीय? घर खरेदी करण्यापूर्वी 'हा' नियम जरुर पाहा, अन्यथा...