PAN-Aadhaar Link deadline : जर तुम्ही देखील अजून तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) पॅन कार्डला (Pan Card) लिंक केले नसेल तर आज ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी आहे. उद्या म्हणजेच 1 जुलै 2023 पासून तुमचे पॅन कार्ड लिंक न केल्यास ते निष्क्रिय होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना अधिक वेळ मिळावा यासाठी ही मुदत वाढवली होती. आयकर नियमानुसार पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य आहे. ज्या व्यक्तींनी आतापर्यंत त्यांचे पॅन आणि आधार लिंक केलेले नाहीत ते 30 जूनपर्यंत तुम्हाला 1000 रुपये विलंब शुल्क भरावा लागणार आहे.
पॅन-आधारच्या ऑनलाईन लिंकिंगमध्ये समस्या असल्यास ते NSDL आणि UTITSL च्या पॅन सेवा केंद्रावरून ऑफलाईन देखील केले जाऊ शकते. याचं कारण म्हणजे निशुल्क लिंकिंगची तारीख आधीच निघून गेली होती. त्यामुळे आज विलंब शुल्क भरून आधार पॅन लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड थेट निष्क्रिय होईल.
पॅन कार्ड-आधार कार्डला लिंक नसेल तर?
जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर सर्वप्रथम तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. तुम्ही निष्क्रिय पॅनद्वारे ITR दाखल करू शकणार नाही आणि तुमच्या प्रलंबित रिटर्नवर प्रक्रिया केली जाणार नाही. एवढेच नाही तर तुमचे प्रलंबित रिफंडही दिले जाणार नाहीत. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर प्रलंबित कार्यवाही पूर्ण केली जाऊ शकत नाही आणि तुमची कर कपात देखील ज्यादा दराने होईल.
पॅन-आधार ऑनलाईन कसे लिंक कराल?
- ऑनलाईन लिंक करण्यासाठी https://incometaxindiaefiling.gov.in/ या लिंकला भेट देऊन आयकर ई-फायलिंग पोर्टल उघडा.
- जर याआधी नोंदणी केली नसेल तर सर्वात आधी नोंदणी करा. तुमचा पॅन क्रमांक हा तुमचा आयडी असेल.
- यानंतर User ID, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- या ठिकाणी तुम्हाला एक पॉप अप विंडो दिसेल, तिथे तुम्हाला आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले जाईल. जर पॉप अप विंडो आली नाही तर 'प्रोफाईल सेटिंग्ज' वर जा आणि 'लिंक आधार' वर क्लिक करा.
- आता या ठिकाणी दिलेला तपशील तुमच्या आधार कार्डशी संबंधित जुळवा. जर हा तपशील जुळत नसेल, तर तुम्हाला चूक दुरुस्त करावी लागेल.
- जर तपशील जुळत असतील, तर तुमचा आधार क्रमांक टाका आणि "link now" बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमचं पॅन आधार कार्डशी लिंक झाला आहे याची खात्री देणारा एक पॉप-अप मेसेज दिसेल.
- तुमचं पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्ही https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ ला देखील भेट देऊ शकता.
एसएमएसद्वारे कसे लिंग कराल?
- तुमच्या फोनवर UIDPAN टाईप करा.
- 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक लिहा.
- आता 567678 किंवा 56161 वर मेसेज पाठवा.