Pakistan Relief: पाकिस्तान (Pakistan) सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा या संकटात असलेल्या पाकिस्तान लामोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) पुन्हा एकदा पाकिस्तानला आर्थिक मदत करणार आहे. IMF कडून पुढील हप्ता म्हणून US 700 दशलक्ष डॉलर मिळणे अपेक्षित आहे. 11 जानेवारी रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कार्यकारी मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊ शकते. 


11 जानेवारीला निर्णय होणार


'डॉन'च्या वृत्तानुसार, आयएमएफचे सध्याचे बोर्ड पाकिस्तानला 700 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा पुढील हप्ता देण्यासाठी चर्चा करणार आहे. 11 जानेवारी रोजी वॉशिंग्टन येथील IMF मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये IMF पाकिस्तानला 'स्टँड-बाय अरेंजमेंट' (SBA) अंतर्गत तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सचा पुढील दिलासा देणार आहे. IMF कार्यकारी मंडळाच्या कॅलेंडरनुसार, 8 जानेवारी आणि 10 ते 11 जानेवारीला बैठका होणार आहेत. शेवटच्या दिवशी पाकिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये US 3 अब्ज डॉलर 'स्टँड-बाय अरेंजमेंट' (SBA) अंतर्गत US 700 दशलक्ष डॉसरच्या पुढील टप्प्याला अंतिम मंजुरी देण्याची तयारी करण्यात आली आहे.


IMF च्या मदत कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला अद्याप 1.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स मिळालेले नाहीत.आयएमएफचा सध्याचा मदत कार्यक्रम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपुष्टात येऊ शकतो. त्याची एकूण रक्कम तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. यापैकी सुमारे US 1.8 बिलियन डॉलर शिल्लक आहे. कारण 1.2 बिलियन डॉलरचा पहिला हप्ता जुलै 2023 मध्ये पाकिस्तानला जारी करण्यात आला होता. पाकिस्तानच्या SBA अंतर्गत पहिल्या पुनरावलोकनाबाबत नोव्हेंबर 2023 मध्ये IMF कर्मचारी आणि पाकिस्तानी अधिकारी यांच्यात कर्मचारी-स्तरीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली.


पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल अपयशी


जागतिक बँकेने (World bank) पाकिस्तानची (pakistan) स्थिती दाखवून जगासमोर लाजवले आहे. जागतिक बँकेने स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल अपयशी ठरले आहे. इथे गरिबांसाठी काहीच नाही. श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी सर्व धोरणे आखली जात आहेत. पाकिस्तानमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. 


डॉन वृत्तपत्राने जागतिक बँकेचे कंट्री डायरेक्टर नाजी बेनहासीनच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.  पाकिस्तानला अशी धोरणे बदलण्याची गरज आहे, की ज्याचा देशाच्या विकासावर परिणाम झाला आहे.  पाकिस्तानच्या धोरणाचा फायदा काही लोकांनाच झाला असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. वामान बदलाचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. सध्या पाकिस्तानने त्यांची कृषी क्षेत्रातील आणि ऊर्जा क्षेत्रातील धोरणे सुधारली पाहिजेत असं मत बेनहासीन यांनी व्यक्त केलं आहे. शेती, अनुदान आणि इतर अनेक उणिवा दूर करण्याची गरज आहे. जेणेकरून देशातील छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल असं बेनहासीन म्हणाले . तसेच, अधिकाधिक लोकांना शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. पाकिस्तानच्या खराब आर्थिक मॉडेलमुळं तो आपल्या सहकारी देशांच्या तुलनेत खूपच मागे पडला असल्याचं मत बेनहासीन यांनी व्यक्त केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तान खूपच मागे, गरिबी दूर करण्यासाठी पाकिस्ताननं काय करावं? जागतिक बँकेनं दिल्ला 'हा; सल्ला