Pahalgam terror attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचण्यास सुरुवात केली आहे. सिंधू जल करार स्थगित करण्यासह व्यापार देखील बंद केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कडक भूमिकेमुळे, पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानच्या या निर्णयानंतर इतर अनेक देशांच्या विमान कंपन्या पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर टाळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानवरुन उड्डाण करण्यावर बंदी घातल्यामुळं भारतीय विमान कंपन्या तोट्यात आहेत. अरब आणि इतर देशांमध्ये पोहोचण्यासाठी विमानांना जास्त वेळ लागत आहे. त्याच वेळी, अनेक प्रमुख पाश्चात्य विमान कंपन्या स्वेच्छेने पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर करत नाहीत. त्याला अशा कोणत्याही बंदीला सामोरे जावे लागत नाही.
युरोपियन विमान कंपन्यांमुळे पाकिस्तानला लाखो डॉलर्सचे फटका
पाकिस्तान एरोस्पेस अथॉरिटीला दरमहा लाखो डॉलर्सचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. कारण ते त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करणाऱ्या विमान कंपन्यांकडून ओव्हरफ्लाइट शुल्क आकारते. गेल्या दोन दिवसांपासून, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे लुफ्थांसा, ब्रिटिश एअरवेज, स्विस, एअर फ्रान्स, इटलीची आयटीए आणि पोलंडची एलओटी यासारख्या काही प्रमुख युरोपीय विमान कंपन्यांनी स्वेच्छेने पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळले आहे. याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे.
एअर इंडियाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका
अहवालानुसार, पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करु न शकल्यामुळे एअर इंडियाला दरवर्षी 600 दशलक्ष डॉलरचे नुकसान होऊ शकते. दुसरीकडे, दरवर्षी ओव्हरफ्लाइट शुल्क न मिळाल्यामुळे पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. फेब्रुवारी 2019 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील दहशतवादी तळावर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर विमान कंपन्यांना हवाई क्षेत्र उपलब्ध नसल्याने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पाच महिन्यांत किमान 100 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले होते. सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक एव्हिएशन (CAPA) ने म्हटले आहे की, पाकिस्तानी हवाई क्षेत्रावरून उड्डाण करू न शकल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना दरमहा 70 ते 80 दशलक्ष डॉलर्सचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तानवरुन उड्डाण करण्यावर बंदी घातल्यामुळं भारतीय विमान कंपन्या तोट्यात आहेत. अरब आणि इतर देशांमध्ये पोहोचण्यासाठी विमानांना जास्त वेळ लागत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आधी शाहिद आफ्रिदी, पुन्हा अभिनेता, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यावर भारताचा 'डिजिटल स्ट्राईक'