मुंबई : हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या ओयो (OYO) कंपनीने दिवाळखोरीची याचिका दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. परंतु सध्या कंपनीच्या संचालकांनी बातमीचे खंडन केले आहे. 


ओयो रुम देशात आणि विदेशात देखील हॉटेल रूम्स उपलब्ध करुन देतात. ओयोच्या माध्यमातून हॉटेल रूम बुक करण्यात येते. ओयो कंपनीनेच दिवाळखोरीची याचिका दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. परंतु ओयो रुम्सचे संस्थापक आणि संचालक रितेश अग्रवाल यांनी बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. 


रितेश अगरवाल यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, दिवाळखोरीसंदर्भात याचिका केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. तसेच दावा करणारे काही पीडीएफ आणि टेक्स्ट मेसेज सोशल मीडियावर सर्क्युलेट केले जात आहेत त्यामध्ये देखील काही तथ्य नाही. 






एनसीएलटीने (NCLT) ने ओयो हॉटेल आणि होम्स प्रायव्हेट लिमिटेड ( OHHPL)विरूद्ध कॉर्पोरेट इनसॉल्वेंसी प्रोसिडिंगला मान्यता दिली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या आदेशानुसार OHHPL निर्मात्यांना15 एप्रिलपूर्वी इंटरिम रिजॉल्यूशन प्रोफेशनला आपला क्लेम सोपवण्यास सांगितले आहे.