Business News : जगातील काही देश जागतिक मंदीच्या (Global recession) गर्तीत सापडले आहेत. मात्र, अशा काळात भारत आर्थिक प्रगती करत आहे. अशातच एक नवीन अहवाल समोर आला आहे. या अहवालात भारताला (India) शेवटचं स्थान मिळालं आहे. मात्र, ही निराशाजनक बातमी नसून, आनंदाची बाब आहे. फ्रँकलिन टेम्पलटने वर्ल्डवाईड रिसेशन प्रोबेबिलिटी नावाने एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये कोणत्या देशात मंदीची शक्यता किती आहे?  हे सांगण्यात आलं आहे.


अहवालात भारताला 0 स्थान 


पुढील वर्षात कोणत्या देशात मंदी येणार याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात भारताच्या समोर शून्य टक्के असे लिहण्यात आले आहे. तर अनेक विकसीत देशामध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. चिंताजनक स्थिती असलेल्या देशामध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांचा समावेश असल्याची माहिती अहवालात देण्यात आलीय. भारतासाठी पुढील काळ चांगला असल्याची माहिती या अहावालात देण्यात आलीय. भारतात कोणत्याही प्रकारे मंदी येण्याची शक्यता नसल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. 


कोणत्या देशात किती टक्के मंदिची शक्यता?


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षी अनेक देशात जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी जर्मनीत मंदी येण्याची 73 टक्के शक्यता आहे. यानंतर इटलीमध्ये 65 टक्के, तर युकेमध्ये 53 टक्के मंदिची शक्यता आहे.  न्यूझीलंड आणि कॅनडामध्ये 50-50 टक्के, अमेरिकेत 45 टक्के मंदीची शक्यता आहे. मेक्सिको 25 टक्के, स्वित्झर्लंडमध्ये 20 टक्के, स्पेन, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये 15 टक्के मंदिची शक्यता असल्याची माहिती या अहवालात देण्यात आलीय. 


भारतात शून्य टक्के मंदिची शक्यता असल्याचे सांगणयात आले आहे. तर  इंडोनेशिया 2 टक्के, सौदी अरेबिया 10 टक्के आणि ब्राझील 10 टक्के शक्यता वर्तवली आहे. इंडोनेशिया आणि ब्रीझील या देशात वेगानं विकास होत असल्याचं चित्र दिसत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


2031 पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न किती असेल? CRISI च्या अहवालात नेमकं काय?