Cryptocurrency : सध्या अनेकजण क्रिप्टोकरन्सीमध्ये (cryptocurrency) गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात, तसंच अनेकांनी गुंतवणूक देखील केली आहे. पण तुम्हीही रिझर्व बँकेकडून (Reserve Bank of india) येणाऱ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. आज सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीमध्ये तूर्तास तरी आरबीआय (RBI) कोणत्याही प्रकारची क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) आणणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.


अर्थराज्य मंत्र्यांची महत्त्वाची माहिती


अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेमध्ये आज लेखी स्वरुपात क्रिप्टोकरन्सीबाबत माहिती दिली. क्रिप्टोकरन्सीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. त्यामुळे आरबीआय सध्यातरी क्रिप्टोकरन्सी घेऊन येण्याबाबच कोणताही प्लान करत नाही. तसंच सध्यातरी आरबीआय कोणत्याही प्रकारची डिजिटल करन्सी आणून रेग्युलेट करणार नसल्याचंही चौधरी यांनी सागंतिलं. क्रिप्टोकरन्सी म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित पूर्णपणे विकेंद्रित प्रणाली आहे. 


आरबीआयचा डिजिटल रुपया लवकरच येणार


आरबीआयचा डिजिटल रुपया आणण्यावर यंदाच्य बजेटमध्ये मोहर लावण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी दिलेल्या बजेट स्पीचमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने स्वत:ची डिजिटल करन्सी 2023 आर्थिक वर्षात आणणार असल्याचं सांगितलं.  याशिवाय निर्मला सीतारमण यांनी क्रिप्टोकरन्सीवर देखील 30 टक्के कर लागणार असल्याचंही यावेळी सांगितलं होतं.


बजेटमध्ये क्रिप्टो टॅक्सचीही घोषणार


अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman) यांनी क्रिप्टोकरन्सी विकताना सरकारला 30 टक्के टॅक्स द्यावा लागणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं असून जर फायद्याशिवाय क्रिप्टोकरन्सी विकत असल्यास एक टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. यामुळे क्रिप्टोकरन्सीची देवाण-घेवाण झालं असल्याचं कळून येणार आहे. 


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha