Share Market Updates :  भारतीय शेअर बाजारात (Share Market) सलग आठव्या दिवशी घसरण दिसून आली आहे. आयटी (IT Sector), एनर्जी आणि फार्मा सेक्टरमधील शेअर्समध्ये नफावसुली दिसून आल्याने आज बाजारात घसरण दिसून आली आहे. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 326.23 अंकांच्या घसरणीसह 58,962.12 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE Nifty) निफ्टी 88.75 अंकांच्या घसरणीसह 17,303.95 अंकांवर बंद झाला. अनेक दिवसानंतर अदानी समूहाच्या शेअर दरात आज खरेदीचा जोर दिसून आला. 

सेक्टरमध्ये काय चित्र?

आज दिवसभरातील व्यवहारात आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी बँकिंग, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये शेअर दरात घसरण दिसून आली. तर, ऑटो, ग्राहकोपयोगी वस्तू, मीडिया सारख्या स्टॉक्सच्या दरात खरेदीचा जोर दिसून आला. आज दिवसभरातील मिडकॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर 33 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 10 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 20 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 

आज या कंपन्यांच्या शेअर दरात चढ-उतार

आज दिवसभरातील व्यवहारात एशियन पेंट्सच्या शेअर दरात 3.03 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये 1.79 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 1.32 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.87 टक्के, एचडीएफसीमध्ये 0.67 टक्के, टाटा मोटर्समध्ये 0.65 टक्के, एचडीएफसीच्या शेअर दरात 0.61 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

तर, टाटा स्टीलच्या शेअर दरात 2.03 टक्क्यांची घसरण दिसून आली. रिलायन्स 1.99 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.77 टक्के, इन्फोसिस 1.46 टक्के, ITC. 1.40 टक्क्यांनी घसरले.

इंडेक्‍स  किती अंकांवर स्थिरावला दिवसातील उच्चांक दिवसातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 58,962.12 59,483.72 58,795.97 -0.55%
BSE SmallCap 27,341.14 27,379.09 27,236.77 0.00
India VIX 14.02 14.57 13.5 0.01
NIFTY Midcap 100 30,117.30 30,166.25 29,875.55 0.01
NIFTY Smallcap 100 9,155.60 9,176.65 9,117.60 0.0041
NIfty smallcap 50 4,127.40 4,149.05 4,112.30 0.09%
Nifty 100 17,083.80 17,195.35 17,039.60 -0.42%
Nifty 200 8,964.55 9,010.60 8,939.55 -0.27%
Nifty 50 17,303.95 17,440.45 17,255.20 -0.51%

गुंतवणूकदारांचे नुकसान

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचेही नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 257.80 लाख कोटी रुपयांवर आले आहे. सोमवारी हे मार्केट कॅप 258 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात BSE वर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 20,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात

आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. सेन्सेक्स निर्देशांकांत सकाळी खरेदीचा जोर दिसत होता. तर, निफ्टीवर विक्रीचा दबाव दिसून आला होता.  सेन्सेक्स 58.26 अंकांच्या तेजीसह 59,346.61 वर उघडला. तर, निफ्टी 9.45 अंकांच्या घसरणीसह 17,383.25 वर उघडला होता.