Sula Vineyards IPO: नाशिककरांसाठी (Nashik) महत्वाची बातमी असून देशासह जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सुला वाइनयार्ड्सने त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ची मान्यता मिळाली आहे.


नाशिकमध्ये द्राक्षापासून वाइनची निर्मिती करणाऱ्या सुला वाइनयार्ड्सचा आयपीओ येणार आहे. सुला वाइनयार्ड्स आयपीओला बाजार नियमक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडून मंजुरी मिळाली आहे. देशातील आघाडीची वाईन उत्पादक आणि सेलर सुला वाइनयार्ड्स आयपीओ जारी करण्यासाठी सेबीची मंजूर मिळाली आहे. कंपनीने याच वर्षी जुलैमध्ये सार्वजनिक इश्यूसाठी मसुदा प्रोस्पेक्ट दाखल केला होता. हा आयपीओ थेट विक्री ऑफर असणार आहे. OFS अंतर्गत ऑफर केल्या जाणार्‍या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये प्रवर्तक, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक 25, 546, 186 इक्विटी शेअर्स ऑफर करतील. सुला वाइनमध्ये लाल, सफेद आणि स्पार्कलिंग वाइन तयार केली जाते. जवळपास 13 ब्रँडच्या अंतर्गत 56 प्रकारचे वाइन तयार करण्यात येते. 


गेल्या वर्षी सुला वाइनयार्ड्सने अहवाल दिला की कंपनीची उत्पादन क्षमता 14.5 दशलक्ष लिटर आहे. कंपनीचा नफा आर्थिक वर्ष 2022 मध्ये अनेक पटींनी वाढून 52.14 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो आर्थिक वर्ष 21 मध्ये केवळ 3.01 कोटी रुपये होता. या कालावधीत महसूल 8.60 टक्के वाढला आणि तो 453.92 कोटी रुपये राहिला. सुला वाइनयार्ड्सच्या वतीने दरवर्षी सुला फेस्ट भरवला जातो. या फेस्टमध्ये देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातूनही पर्यटक येतात देशातील महत्त्वाच्या फेस्टमध्ये आता सुला फेस्टचा समावेश होतो.


नाशिकस्थित सुला वाइनयार्ड्सने जुलैमध्ये आयपीओद्वारे भांडवल उभारण्यासाठी बाजार नियामकाकडे कागदपत्रे दाखल केली होती. सुला वाइनयार्ड्स हे भारतीय वाइन सर्वाधिक प्रचलित असून अलिकडच्या तिमाहीत विक्रीत वाढ झाली आहे. 


पहिली वाइन तयार करणारी कंपनी


सुलाचे मुख्यालय नाशिक येथे असून नाशिक आणि बेंगळुरू येथे प्रत्येकी दोन उत्पादन युनिट आहेत. सुला वाइनयार्ड्स ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणारी पहिली वाइन तयार करणारी कंपनी असणार आहे. त्याच वेळी, अल्कोहोल आणि स्पिरिट्स विभागात आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी असेल. जानेवारीपर्यंत, त्याची उत्पादन क्षमता 13 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त होती, त्यापैकी 11 दशलक्ष लिटर नाशिकमध्ये आणि 2 दशलक्ष लिटर कर्नाटकात आहे. या फर्मचा देशांतर्गत वाइन उद्योगात बाजारातील मोठा वाटा असून विविध किमती श्रेणींमध्ये वाइन ब्रँडच्या विविध पोर्टफोलिओद्वारे आणि विस्तृत वितरण नेटवर्कद्वारे चालविले जाते.