Infosys News : इन्फोसिस (Infosys) ही भारतातील (India) सर्वात मोठी दुसरी आयटी कंपनी आहे. नारायण मूर्ती (Narayana Murthy) हे या कंपनीचे प्रमुख आहेत. त्यांनी आपल्या पाच महिन्यांचा नातू एकाग्रला (Ekagra) 15 लाख शेअर्स भेट दिले आहेत. या शेअर्सवर एकाग्रला 4.2 कोटी रुपयांचा लाभांश मिळाला आहे. नुकताच इन्फोसिस कंपनीने लाभांश जाहीर केले आहेत. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 

चार महिन्यांच्या नातवाला दिले 240 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स


इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी अवघ्या चार महिन्याच्या नातवाला  240 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स भेट दिले होते. त्या शेअर्सवर एकाग्रला आता 4.2 कोटी रुपयांचा लाभांश मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात इन्फोसिसचे प्रति शेअर 20 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. अंतिम लाभांश आणि विशेष लाभांशाची रेकॉर्ड तारीख 31 मे 2024 आहे. 1 जुलै 2024 रोजी लाभांश दिला जाणार आहे.

 

नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा मुलगा रोहन मुर्तीला नोव्हेंबरमध्ये मुलगा झाल्याची घोषणा नारायण मूर्ती यांनी केली होती. एकाग्र असं त्याचे नाव ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांचा विवाह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झाला होता. दरम्यान, काही दिवसापूर्वीच सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड झाली आहे.

कोणाच्या नावे किती हिस्सेदारी


नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा इन्फोसिसमध्ये 0.93 टक्के हिस्सा आहे. सुधा मूर्ती यांच्याकडे 3,45,50,626 इन्फोसिस स्टॉक्स आहेत. देशातील बड्या उद्योगपतीपैंकी त्या एक आहेत. तर नारायण मूर्ती आणि सुधा मुर्ती यांची मुलगी अक्षता मुर्ती यांच्या नावावर देखील इन्फोसिसमध्ये मोठी हिस्सेदारी आहे. त्यांची या कंपनीत 1.05 टक्के हिस्सेदारी आहे. तर मुलगा मुलगा रोहन मुर्ती यांची कंपनीत सर्वात मोठी हिस्सेदारी आहे. रोहन यांची कंपनीत 1.64 टक्के हिस्सेदारी आहे. त्याच्याजवळ कंपनीचे 6,08,12, 892 शेअर्स आहेत.

 


एकाग्र मूर्ती बनला देशातील सर्वात तरुण करोडपती



नारायण मुर्ती (Narayan Murthy ) यांच्या नातवाच्या नावावर 15 लाख शेअर्स आहेत. या शेअर्सची किंमत 240 कोटी रुपये आहे. यामुळं नारायण मुर्ती यांचा नातू एकाग्र जगातील सर्वात तरुण करोडपती (Yongest Millionaire ) झाला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या: