Mustard Price : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली असून आणखी एका टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी आहे. दरम्यान, या काळात कोणत्याबी वस्तूंच्या दरात वाढ होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, काही वस्तूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या मोहरी (Mustard) आणि हरभऱ्यांच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. तर काही वस्तूंच्या दरात घसरण देखील होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कोणतीही वस्तू जर महाग झाली तर त्याचा थेट परिणाम मध्यमवर्गीयांच्या खिशावर होतो. याबद्दल बोलायचे झाले तर अनेक वस्तूंच्या किंमती बाजारात चढ्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांचा खिसा मोकळा झाला आहे. गेल्या काही काळापासून कांद्याने सर्वसामान्यांना रडवले होते. त्यामुळे सरकारला निर्यातीवर बंदी घालावी लागली आहे. सध्या मोहरी आणि हरभऱ्याच्या दरात वाढ होत आहे.
मोहरीचे दरात 600 ते 700 रुपयांची वाढ
मोहरीच्या दरात वाढ झाल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या मोहरी आहे, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजारातील मोहरीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी उत्पन्न बाजारातील मोहरीचे भाव सुमारे 600 ते 700 रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. तेल गिरण्यांकडून मोहरीच्या वाढत्या मागणीमुळे मोहरीचे भाव वाढत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
हरभऱ्याच्या दरातही वाढ कारण...
एका बाजूला मोहरीचे दर वाढत असताना दुसऱ्या बाजूला हरभऱ्याच्या दरातही वाढ होतेय. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये यंदा हरभरा पिकात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं हरभऱ्याच्या भावात वाढ झाली आहे. सध्या हरभरा 6300 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. त्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुगाच्या किमतीत घट
एका बाजुला काही वस्तूंच्या दरात वाढ होत असताना दुसऱ्या बाजुला काही वस्तूंच्या दरात घट होताना दिसत आहे. सध्या मूग डाळीच्या दरात घसरण होत आहे. मूग डाळीचे दर 8050 हे प्रतिक्विंटल 8150 रुपये प्रतिक्विंटल होते. मोठ्या घसरणीनंतर तो आता 7000 रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुगाच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
देशात अन्नधान्य, इंधन, वीज महागले, घाऊक महागाई दरात वाढ!