Bharati Pawar on Onion : आम्ही सगळ्यांनी कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) हटवावी अशी मागणी केली होती. काहीही करा आणि कांदा निर्यात खुली करा अशी मागणी केल्याचे मत दिंडोरीच्या खासदार भारती पवार (Bharati Pawar) म्हणाल्या. या निर्णयामुळं कांद्याला चांगला भाव मिळेल ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळं हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय असल्याचे मत भारती पवार यांनी व्यक्त केलं. सरकारनं कांदा निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारती पवार बोलत होत्या.  


डीजीएफटीने काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टता आहे की, किमान निर्यात मूल्य  550 डॉलर प्रति टन असणार आहे. पर मेट्रिक टनामुळं आता कोणीही मनात संभ्रम बाळगू नये, निर्यात पूर्ण खुली झाली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि अजित पवार या सगळ्यांचे आभार मानते असेही पवार म्हणाल्या.  


आवक वाढली की असे निर्णय घेतले जातात


गेल्या 5 वर्षापासून मी कांद्यावर काम करते आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कांद्याला 1500 ते 2000 भाव मिळावा. आवक वाढली की असे निर्णय घेतले जातात. आताही आवक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे भारती पवार म्हणाल्या. आता MEP लावल्याने शेतकऱ्याना दर मिळेल, शेतकऱ्यांकडून चांगल्या दराने माल घेतला जाईल असं पवार म्हणाल्या.  


आता शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील


दरम्यान, कांद्यावर निर्यात शुल्क आकारल्याच्या मुद्यावरुन विविध शेतकरी संघटनांनी सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. निर्यातबंदी हटवली पण दुसरीकडे निर्यातशुल्क लावले आहे. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय. यावर बोलताना भारती पवार म्हणाल्या की, कांद्याचे भाव वाढले आहेत, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. निर्यातशुल्क नाही MEP टाकली आहे. या निर्णयामुळे विरोधक नाराज झाले असतील, दुःखी झाले असतील की निर्यात खुली झाली असं भारती पवार म्हणाल्या. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पवार म्हणाल्या.  


लवकरच नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार


आता कांदा निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळं आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. मोदीजींची सभा आमच्यासाठी महत्वाची आहे. त्यांची सभा व्हावी अशी आमची मागणी आहे.  लवकरच नाशिकच्या सभेची तारीख कळवली जाणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


निर्यातबंदी हटवली, पण शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, कारण... कांद्याच्या मुद्यावरुन शेतकरी संघटना आक्रमक