Investmant Plan: अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुंतवणूक करताना दोन गोष्टी गरजेच्या आहेत, एक म्हणजे आपली ठेव सुरक्षीत असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुंतवणुकीवर मिळणारा परतावा. तुम्ही जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर अल्पावधीतच तुम्ही करोडपती होऊ शकता. तुम्हाला तर फक्त 25 हजार रुपये पगार असला तरी करोडपती बनू शकता. हे कसं शक्य आहे ते जाणून घेऊयात.


आर्थिक नियम असे सांगतो की कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत त्याच्या उत्पन्नाच्या 20 टक्के गुंतवणूक करावी. जर तुम्ही दरमहा रु 25,000 कमावले तर तुम्ही 20 टक्के दराने दरमहा 5000 रुपये गुंतवू शकता. या गुंतवणुकीतून तुम्ही स्वतःला करोडपती कसे बनवू शकता ते जाणून घ्या. जर तुम्हाला गुंतवणुकीबाबत योग्य माहिती असेल तर तुटपुंज्या पगारातही मोठा निधी जमा करणे ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला हवे असेल तर केवळ 25 हजार रुपये पगार मिळूनही तुम्ही स्वतःसाठी करोडो रुपयांचा निधी जमा करु शकता. मात्र, यासाठी तुम्हाला ठराविक रक्कम दीर्घ काळासाठी गुंतवावी लागेल. 


5000 रुपये प्रति महिना गुंतवणूक आवश्यक 


आर्थिक नियम सांगतो की कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत त्याच्या उत्पन्नाच्या 20 टक्के गुंतवणूक करावी. जर तुम्ही दरमहा 25,000 कमावले तर तुम्ही 20 टक्के दराने दरमहा 5,000 गुंतवू शकता. आता प्रश्न पडतो की गुंतवणूक कुठे करायची, मग तुम्ही म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करू शकता. एसआयपीमध्ये तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो. मार्केट लिंक्ड असल्याने त्यामध्ये कमी जोखीम असल्याने आणि रिटर्नची हमी नाही, परंतु गेल्या काही वर्षात SIP रिटर्न सरासरी 12 टक्क्यांपर्यंत दिसला आहे. अशा स्थितीत आज तज्ज्ञ याला गुंतवणुकीचे उत्तम साधन मानत आहेत.


26 वर्षात करोडपती 


तुम्ही दरमहा 5,000 रुपयांची SIP सुरु करत असाल, तर तुम्हाला ही गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवावी लागेल. SIP वर सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. कधीकधी ते आणखी चांगले असू शकते. परंतू जर आपण सरासरी परताव्यानुसार गणना केली तर, जर तुम्ही 26 वर्षांसाठी SIP मध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही 15,60,000 रुपये गुंतवाल, परंतु 12 टक्के परताव्यानुसार तुम्हाला 91,95,560 रुपये व्याज मिळेल. तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 15,60,000 आणि  91,95,560 व्याजाची रक्कम 1,07,55,560 रुपये आहे. अशाप्रकारे 26 वर्षात तुम्ही एक कोटींहून अधिकचे मालक व्हाल. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी ही गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही वयाच्या 51 व्या वर्षी करोडपती होऊ शकता.


(टीप : कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)