Microsoft Layoffs : जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याची तयारी सुरू केली आहे.  प्रसिद्ध आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टने एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. अमेरिकेतील के न्यूज संकेतस्थळानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. जुलैनंतर तिसऱ्यांदा मायक्रोसॉफ्ट कंपनीनं इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांची कपात केली, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून देण्यात आलेली नाही. 


मायक्रोसॉफ्टमध्ये एक कोटी 80 लाख कर्मचारी काम करतात. जुलैनंतर कंपनीनं एक टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीनं कर्मचारी कपातीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. व्यवसायाच्या प्राधान्यांचे मूल्यांकन केले जाते, त्यानंतर असा निर्णय घेतला जातो, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.  जुलैमधील कर्मचारी कपातीनंतर कंपनीने कस्टमर फोकस्ड रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समधन 200 कर्मचाऱ्यांना काढलं होतं. 


जागितिक आर्थिक मंदीचं संकट उभ राहण्याच्या भीतीनं नुकतेच अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली होती.  येणारे दिवस कर्मचाऱ्यांसाठी आणखी कठीण असू शकतात, असे म्हटले जातेय. कंपनीनं वेगवेगळ्या टीममधून कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीतून काढल्यानंतर कर्मचारी ट्वीटरसह इतर सोशल मीडियावर टिप्पणी केली जात आहे. दरम्यान, क्रंचबेसद्वारा तयार करण्यात आलेल्या डेटानुसार, अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांनी 32000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये मायक्रॉसॉफ्ट कंपनीचाही समावेश आहे. त्याशिवाय उबर आणि Netflix या कंपन्यासोबत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि लेंडिंग फ्लेटफॉर्म या कंपनीमधूनही कर्मचारी कपात झाली आहे.  


प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार,  Intel Corp कंपनी लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. हजारो कर्मचाऱ्यांना कंपनी काढू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. दरम्यान, पर्सनल कॉम्प्यूटर सेगमेंट, पीसी प्रोसेसर्सच्या विक्रीमध्ये सातत्यानं घसरण होत आहे, त्यामुळे कंपनीपुढे मोठं संकट उभं राहिले आहे. त्यामुळेच कर्मचारी कपात केली जात आहे.  


जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी येणार? 
मागील दोन वर्षांत जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्या होत्या. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर काही देशांच्या अर्थव्यवस्था आता कुठे हळू हळू पूर्वपदावर येत आहेत. अशातच 2023 मध्ये जगातील अनेक देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी दिलाय. लोकांच्या उत्पन्नात  होणारी घट आणि वाढती महागाई याचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचं प्रमाण आणखी वाढू शकते.. असं सांगण्यात येतंय... इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या इशाऱ्यामुळे चिंतेत भर पडली आहे.