Market News FPI Investment : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच FPIs पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारांमध्ये (India Market News) परत येऊ लागले आहेत. चीनसह इतर काही देशांमध्ये कोविड संसर्गाचा (China corona update) पुन्हा प्रसार आणि शेअर बाजारात घसरण होऊ लागली आहे. परंतु विदेशी गुंतवणूकदारांचा भारताचावरचा विश्वास कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) विदेशी गुंतवणूकदारांनी 11 हजार 557 कोटी रुपयांची गुंतवणूक ( FPI Investment 11,557 crore investment by foreign investors ) केली आहे.
दरम्यान येत्या काळात बाजारातील हालचाल अमेरिकेच्या मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि कोविड संक्रमणाची (Covid Cases Update) स्थिती यावरून ठरवली जाईल असं जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही.के.विजयकुमार (Vk Vijay Kumar)यांनी म्हटलं आहे.
1-23 डिसेंबर दरम्यान शेअर्समध्ये 11,557 कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (investment by foreign investors )डिसेंबर 1-23 दरम्यान इक्विटीमध्ये 11,557 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यापूर्वी एफपीआयने नोव्हेंबरमध्ये (FPI) 36,200 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती असं डिपॉझिटरी डेटाची आकडेवारी सांगते आहे.
एफपीआयने ऑक्टोबरमध्ये शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री
एफपीआयने ऑक्टोबरमध्ये शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री
यूएस डॉलर इंडेक्स (US) कमकुवत झाल्यामुळे आणि सकारात्मक आर्थिक ट्रेंडमुळे आयपीआयचा कल भारतीय बाजारांकडे वाढला. डिपॉझिटरी डेटानुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली होती तर सप्टेंबरमध्ये 7,624 कोटी रुपये काढले होते.
परदेशी गुंतवणूकदार हळूहळू सावध होत आहेत
परदेशी गुंतवणूकदार हळूहळू सावध होत आहेत
बाजारातील घसरण आणि कोविड संक्रमणाबाबतची (Corona cases) भीती असूनही, FPIs भारतीय शेअर बाजारात (डिसेंबरमध्ये) निव्वळ खरेदीदार राहिले. 23 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात निव्वळ प्रवाहात घट झाली आहे, यावरुनच गेल्या काही काळामधील घडामोडी आणि अनिश्चितता लक्षात घेता परदेशी गुंतवणूकदार हळूहळू सावध होत आहेत असं मॉर्निंग स्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर - मॅनेजर रिसर्च हिमांशू श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.
ही बातमी देखील वाचा