Mark Zuckerberg India : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सीईओ असलेल्या मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी भारताचं कौतुक केलं आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी जागतिक नेता असे भारताचे वर्णन केले आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भारतातील लोक आणि कंपन्या आघाडीवर असल्याचे मत मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात झुकेरबर्ग बोलत होते. 


व्हॉट्सअॅप आणि फेसबुक आता मेटा कंपनीचा भाग आहेत. याचे सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत. मुंबईत आयोजित व्हॉट्सअॅप कार्यक्रमात बोलतना त्यांनी भारताचं कौतुक केलं. WhatsApp ने PayU आणि Razorpay सोबत हातमिळवणी करण्याची घोषणा केली. यामुळं व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI अॅप इत्यादीद्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअॅपवर व्यवसायांसाठी व्हेरिफिकेशन सुविधा सुरू केली आहे. अनेक भारतीय कंपन्या त्यांच्याकडे अशा सुविधेची मागणी करत आहेत.


व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर 'फ्लो'


या कार्यक्रमादरम्यान मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअॅप फ्लोज नावाचे एक नवीन फीचर देखील सादर केले आहे. हे वैशिष्ट्य कंपन्यांना चॅट कस्टमाइझ आणि वैयक्तिकृत करण्यास अनुमती देईल. झुकेरबर्गने एक उदाहरण देऊन हे वैशिष्ट्य स्पष्ट केले. समजा एखादी बँक असेल, तर या फीचरद्वारे ग्राहकांना बँक खाते उघडण्याची किंवा चॅटद्वारेच तिची इतर सेवा मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. त्याचप्रमाणे विमान कंपन्या तिकीट बुक करण्याची सुविधा देऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना चॅट न सोडता या सेवेचा लाभ घेता येणार आहे. भारतातील लोक आणि भारतीय कंपन्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आघाडीवर असल्याचे मत मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Facebook: मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेबद्दल धक्कादायक खुलासा; सुरक्षेवर तीन वर्षांत कोट्यवधी डॉलर्स खर्च