Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) आता खातेधारकांसाठी RTGS आणि NEFT या सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. दळणवळण मंत्रालयाकडून RTGS आणि NEFT सेवा सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली. पोस्ट ऑफिसमधले बचत खातेधारक 31 मे 2022 पासून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. सध्या याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरु आहे.


डाक विभागातील खातेधारकांसाठी RTGS आणि NEFT सेवा 31 मे पासून सुरु होत असून लवकरच डाक विभागातील सर्व कार्यालयांना या संबंधी सूचना देण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी या सेवांची माहिती प्रसिद्ध केली जाईल असं डाक विभागाने प्रसिद्ध केलेल्या आपल्या एका अहवालात म्हटलं आहे.


RTGS आणि NEFT शुल्क आणि मर्यादा



  •  दहा हजार रुपये देवाण-घेवाणीसाठी 2.50 रुपये शुल्क अधिक जीएसटी

  • दहा हजारापासून पुढे 1 लाख रुपयांपर्यंत 5 रुपये शुल्क अधिक जीएसटी

  • एक लाखापासून पुढे दोन लाख रुपयांपर्यंत 15 रुपये शुल्क अधिक जीएसटी

  • दोन लाखापासून पुढे 25 रुपये शुल्क अधिक जीएसटी


RTGS आणि NEFT सेवेच्या मुख्य गोष्टी



  • ई-बँकिंग एम- बँकिंगद्वारे जावकांसाठी NEFT करण्याकरिता कोणतेही शुल्क नाही

  • ई-बँकिंग एमबँकिंगद्वारे NEFT साठी दोन लाखाइतकीच मर्यादा असेल

  • दिवसभरात तुम्ही केवळ पाच वेळाच ट्रान्झॅक्शन करु शकता

  • ई-बँकिंग एम-बँकिंगद्वारे जावकांसाठी NEFT करण्यासाठी लिमिट दहा लाख असेल

  • ग्राहकांची फसवणूक होवू नये म्हणून आवक-जावकंसाठी देवणा-घेवाण सेवेला मर्यादा असतील

  • NEFT करण्यासाठी शुल्क कमीतकमी 1 रुपया तर जास्तीत जास्त 15 लाख आकारले जातील


संबंधित विषयाची तक्रार कुठे कराल?


इंडियन पोस्ट कस्टमर केअर नंबर 1800 2666868  या क्रमांकावर तुम्ही फोन करुन आपली तक्रार नोंदवू शकता.


याशिवाय इंडिया पोस्ट वेबसाइट https://www.indiapost.gov.in/VAS/pages/ComplaintRegistration.apx  यामध्ये फायनान्सशिअर सर्व्हिसेस, सेव्हिंग बँक सर्व्हिसेस अंतर्गत तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता.


संबंधित बातम्या :



पोस्ट ऑफिसची खास योजना: एकदाच दोन लाख गुंतवा अन् 13200 रूपये हमी उत्पन्न मिळवा 


इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 820 कोटींच्या आर्थिक मदतीला मंजुरी