Maharashtra News Live update : नाना पटोलेंचे पाय धुणारा नॉट रिचेबल, शेगावमधील काँग्रेसचे कार्यकर्ते, नेत्यांना न बोलण्याची तंबी!

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

प्रज्वल ढगे Last Updated: 18 Jun 2024 09:35 PM
ओबीसी आंदोलनावर बंजरग सोनवणेंनी बोलणं टाळलं

मराठा समाजापाठोपाठ ओबीसी समाज सध्या आरक्षण वाचविण्यासाठी आक्रमक बनला आहे. त्यावर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी ओबीसीच्या उपोषणाविषयी बोलणे टाळले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुदत दिलेली आहे. त्यात मी बोलणं संयुक्तिक नाही. मात्र, मला सरकारवर बोलायचं नाही. सरकार कशात गंभीर आहे आणि कशात नाही यावर मी बोलणं संयुक्तिक नसून त्यात काही बोलायचं नाही, असे म्हणत सोनवणे यांनी बोलणे टाळले आहे.

नाना पटोलेंचे पाय धुणारा नॉट रिचेबल, शेगावमधील काँग्रेसचे कार्यकर्ते, नेत्यांना न बोलण्याची तंबी!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं कार्यकर्त्यांने पाय धुण्याच प्रकरण.


शेगाव येथील कार्यकर्त्यांना व नेत्यांना यासंबंधी न बोलण्याची नेत्यांनी तंबी दिल्याची माहिती.


याप्रकरणी काँग्रेस बॅकफूटवर पडल्याने काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांना न बोलण्याची तंबी दिल्याची माहिती.


पाय धूनारा कार्यकर्ता विजय गुरव हा सकाळ पासून नॉट रीचेबल.


विजय गुरव यांच्या घरी शेगाव जवळील कालखेड या गावी चौकशी केली असता ते बाहेरगावी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नी वर्षा गुरव यांनी दिली आहे.

शक्तीपीठ महामार्गाला शाहू महाराज यांचा विरोध, शेतकऱ्यांवर मार्ग लादला जात असल्याचा दावा

शक्तीपीठ महामार्गविरोधी आंदोलन


शाहू महाराज यांचा महामार्गाला विरोध 


आपण ठरवलं आहे की हा शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही


या महामार्गाची मागणी कुणीही केली नसताना शेतकऱ्यांवर हा मार्ग का लादला जातो


गोव्याला जाणारे अनेक मार्ग आहेत ते दुरुस्त करा


कंत्राटदारांसाठी हा महामार्ग काढला आहे


शेतीमधून जाणारा हा महामार्ग नको


12 तारखेनंतर आंदोलनाचा कोणता मार्ग अवलंबायचा ते ठरवू


शेतकऱ्यांची शक्ती वाढणार नाही तो महामार्ग आम्हाला नको, असे शाहू महाराज म्हणाले

Tukaram Mundhe Transfer : आएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली!

अखेर पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली


विकास आयुक्त असंघटित कामगार मुंबई या ठिकाणी तुकाराम मुंढे यांची नवीन जागी नियुक्ती 


नेहमीच चर्चेत असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली

मुंडे बंधू-भगिनीनंतर आता छगन भुजबळदेखील लक्ष्मण हाकेंची भेट घेणार 

मुंडे बंधू-भगिनीनंतर आता छगन भुजबळदेखील लक्ष्मण हाकेंची भेट घेणार 


येत्या दोन दिवसांत छगन भुजबळ जालना जिल्ह्यातील आंदोलनस्थळी जाऊन हाके यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा देणार 


लक्ष्मण हाके यांचा ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध 


समता परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत हाके आणि मंगेश ससाणे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता छगन भुजबळ आंदोलकांची भेट घेणार

Congress Meeting In Delhi : 25 जूनला दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक, खरगे यांच्या उपस्थितीत बैठक

25 जूनला दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत बैठक


महाराष्ट्रातले सर्व काँग्रेसचे ‌नेते उपस्थित‌ ‌राहणार

Ramdas Athawale On Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीत आम्हाला आठ ते दहा जागा द्याव्यात, रामदास आठवले यांची मागणी!

महायुतीत विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा आणखी वाढणार आहे. कारण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही दहा जागांवर दावा केला आहे. लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही, तरी आम्ही जोमानं काम केलं. महायुतीच्या निवडणूक आलेल्या सतरा खासदारांमध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे. त्यामुळं येत्या विधानसभेत आम्हाला महायुतीने आठ ते दहा जागा मिळाव्यात, अशी मागणी आठवलेंनी केली आहे. पुण्याच्या लोणावळ्यात खासगी कार्यक्रमासाठी आठवले आले होते, त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. अजित पवार गटाला लवकरच केंद्रात एक मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं गुपितही आठवलेंनी फोडलं.

मोठी बातमी! सगे-सोयरे अधिसूचनेची पुण्यात केली जाणार होळी; अधिसूचना रद्द करण्याची ओबीसी संघटनांची मागणी 

पुणे : सगे सोयरे अधिसूचनेची पुण्यात होळी केली जाणार


सगेसोयरे अधिसूचना रद्द करा, ओबीसी संघटनांची मागणी 


ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी पुण्यात मंगेश ससाणे यांचे उपोषण


पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला ससाणे यांचं सुरु आहे उपोषण


5 दिवस झाले तरी सरकारकडून दखल न घेतल्याने सगे सोयरे अधिसुचनेची होळी केली जाणार

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री घेणार आढावा 

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री घेणार आढावा 


आज वर्ष निवासस्थानी होणार बैठक 


ओबीसी आरक्षणासाठी हाके यांचेदेखील उपोषण सुरू 


यासंदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करणार

OBC Hunger Strike : हाके यांच्या आंदोलनाला समर्थन, हतोला येथील गावकरी बसले उपोषणाला

हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी हतोला येथील गावकरी बसले उपोषणाला.


ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका या मागणीसाठी वडीगोद्री येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील अनेक लोक या ठिकाणी एकत्र आले आहेत. काल ओबीसींच्या आंदोलनाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी जाऊन भेट दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक लोक त्या आंदोलनाला भेट देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हातोला या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात 

Jayanat Patil : जयंत पाटील अॅक्शन मोडमध्ये, या आठवड्यात पक्षाच्या विविध विभागांच्या घेणार मॅरेथॉन बैठका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची या आठवड्यात पक्षसंघटनेच्या संदर्भात विविध सेलच्या मॅरेथॉन बैठकांचं सत्र


आज मंगळवारी पहिली बैठक ही माजी सैनिक सेलची बैठक होईल. त्यानंतर सामाजिक न्याय विभाग सेल, विजेएनटी सेल आणि युवक सेलची बैठक होणार आहे


उद्या 19 तारखेला पहिली बैठक ही सेवादलची होणार आणि त्यानंतर आदिवासी सेलची बैठक होणार


परवा 20 तारखेला विद्यार्थी सेल, ओबीसी सेल आणि युवती सेलचा आढावा बैठक होणार आहे


आणि 21  तारखेला जयंत पाटील हे इस्लामपूर च्या दौऱ्यावर असणार


पु22 तारखेला महिला आघाडीची बैठक पुण्यात होणार होणार

पुण्यातील गुटखा रॅकेट चालवणाऱ्या मास्टरमाईंडला अटक, हडपसर भागातून ठोकल्या बेड्या!

पुण्यातील गुटखा रॅकेट चालवणाऱ्या मास्टरमाईंडला अटक


निलेश ललवाणी असे या गुटखा रॅकेट चालवणाऱ्या मास्टरमाईंडचे नाव


हडपसर भागातून ललवाणी याला अटक करण्यात आली


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नऱ्हे भागातून 1 कोटी 63 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता


पुण्यातील गुटखा कारखाना आणि गोडाऊनवर पोलिसांनी छापेमारी केली होती


याप्रकरणी 4 जणांना याआधीच अटक केली होती


पुण्यासह, नगर, सातारा, नाशिक या ठिकाणी होत होती गुटख्याची विक्री


याप्रकरणातील मुख्य आरोपी हा फरार होता


अखेर आज त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे

दिल्लीत महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महा बैठक, भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्ली दौऱ्यावर

दिल्लीत महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महा बैठक 


देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत होणार नाही 


महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण व समीक्षा करण्यासाठी आज दिल्लीत बैठक


विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्याबाबत होणार चर्चा 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा बैठकीला उपस्थित राहणार 


देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, पियुष गोयल, हंसराज अहीर, चंद्रकांत पाटील असे सगळे नेते दिल्लीत बैठकीसाठी येणार 


विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला जाणार

Pune Police Recruitment : पोलीस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन

पुणे : पोलीस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन


पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थी एकवटले


पोलीस भरतीसंदर्भात मार्च 2023 मध्ये काढलेल्या जीआरमध्ये 4 महिने मुदतवाढ करावी, विद्यार्थ्यांची मागणी


पोलीस शिपाई भरतीला एक संधी देण्यात यावी


मराठा प्रमाणपत्र SEBC न मिळल्याने आमचे अर्ज भरण्यात आले नाहीत, विद्यार्थ्यांचा आरोप

उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतदान केंद्रात मोबाइल देणारे इनकोर आॅपरेटर दिनेश गुरव यांच्या अडचणीत वाढ

मुंबई : उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतदान केंद्रात मोबाइल देणारे इनकोर आॅपरेटर दिनेश गुरव यांच्या अडचणीत होणार वाढ



अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार इनकोर आॅपरेटर यांची यादी पोलिसांना देण्यात आली होती



या यादित दिनेश गुरव यांचंही नाव होतं, तसेच च्यांना त्यांच्याजवळील मोबाइल हा केवळ ETPBMS व Encore साठीच्या OTP पूरताच मोबाइल स्वत: जवळ ठेवण्याच्या सूचना होत्या.


अन्य वेळी मोबाइल सायलेन्ट करून निवडणूक निरीक्षक / निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ठेवण्याच्या सूचना असताना दिनेश गुरव यांनी त्यांचा मोबाईल बेकायदेशीररित्या मंगेश पंडिलकर यांना वापरण्यात दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


या प्रकरणी वनराई पोलिसांनी अधिक तपास करत आहेत.

Pune Crime : पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगून पुण्यात 50 लाखांची फसवणूक

पुणे : पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगून 50 लाखांची फसवणूक


शासनाचे टेंडर मिळवून देतो म्हणत केली फसवणूक


पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर


आरोपी आणि फिर्यादी यांची थेट पुण्यातील विधानभवनात भेट


49 वर्षीय व्यक्तीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केली फिर्याद


यावरून कश्मिरा पवार आणि गणेश गायकवाड या 2 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू, विक्रम काळे यांनी घेतली अजित पवारांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू 


विधानपरिषद आमदार विक्रम काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली 


 भेटीमध्ये मंत्रिपदाची संधी मिळावी अशी विनंती केल्याची विश्वनीय सूत्रांची माहिती


या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील भाटीया उद्यानात शेतकऱ्यांचे आंदोलन

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील भाटीया उद्यानात शेतकऱ्यांचे आंदोलन


अप्पर वर्धा धरणगरस्त शेतकऱ्यांनी केलं आंदोलन


आंदोलनाची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात


सर्व आंदोलनकर्त्यांना पोलीस आझाद मैदान पोलीस ठाण्यात घेऊन आले आहेत


मागच्यावेळी या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतं केलं होतं आंदोलन

पार्श्वभूमी

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आपापल्या नेत्यांकडे लॉबी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची (State Assembly Election) तयारीही चालू झाले आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या त्यासाठी बैठका चालू आहेत. दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी पावसाने (Rain Update) दडी मारली आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या धारा बरसत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बाबींची माहिती वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.