नाशिक: डिसेंबर महिना सुरु झाल्यानंतर सर्वांना नव्या वर्षाचे वेध लागतात. त्याप्रमाणं नव्या वर्षात शासकीय सुट्ट्या किती असणार याबाबत देखील उत्सुकता असते. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील वर्षातील म्हणजेच 2025 मधील शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे 2025 मध्ये भाऊबीजेची सुट्टी देखील देण्यात आली आहे. त्यामुळं 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे. 

2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी

1. प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी 20252. छत्रपती शिवाजी महाराज जयंती -19 फेब्रुवारी 20253. महाशिवरात्री-26 फेब्रुवारी 20254. होळी (दुसरा दिवस)-14 मार्च 20255. गुढी पाडवा- 30 मार्च 20256. रमझान ईद-31 मार्च 20257. रामनवमी -6 एप्रिल 20258. महावीर जन्म कल्याणक-10 एप्रिल 20259. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल 202510.गुड फ्रायडे -18 एप्रिल 202511.महाराष्ट्र दिन -1 मे 202512. बुद्ध पौर्णिमा -12 मे 202513. बकरी ईद-07 जून 202514. मोहरम -06 जुलै 202515 .स्वातंत्र्य दिन -15 ऑगस्ट 202516.पारशी नववर्ष दिन -15 ऑगस्ट 202517. गणेश चतुर्थी - 27 ऑगस्ट 202518. ईद ए मिलाद- 5 सप्टेंबर 202519. महात्मा गांधी जयंती- 02 ऑक्टोबर 202520. दसरा -02 ऑक्टोबर 202521. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) - 21 ऑक्टोबर 202522. दिवाळी (बलिप्रतिपदा)- 22 ऑक्टोबर 202523. भाऊबीज- 23 ऑक्टोबर 202524. गुरुनानक जयंती -5 नोव्हेंबर 202525 .ख्रिसमस-25 डिसेंबर 2025   

भाऊबीजेची सुट्टी देण्याचा निर्णय

राज्य सरकारनं पहिल्यांदा जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये भाऊबीजेच्या सुट्टीचा समावेश नव्हता. मात्र, त्यानंतर पुन्हा पत्रक काढून त्याचा समावेश केल्याचं सांगण्यात आलं. शासकीय कर्मचाऱ्यांना 2025 मिळणार भाऊबीजेची सुट्टी मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचंड यशानंतर राज्य सरकारने भाऊबीजेची सुट्टी जाहीर केली आहे. सरकार कडून लाडकी बहीण आणि लाडक्या भावाला सुट्टीचे गिफ्ट देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांमध्ये विशेष उल्लेख करत अतिरिक्त सुट्टी जाहीर देण्यात आली आहे.  दरवर्षी मिळणाऱ्या  एकूण 24 सुट्ट्यांमध्ये अधिक एका सार्वजनिक सुट्टीची भर पडली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा 

राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरु केली होती. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या निमित्तानं राज्यातील अर्जदार महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दरमहा 1500 रुपयांप्रमाणं तीन हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे देखील पैसे देण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम महिलांच्या खात्यावर पाठवण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत महिलांना 7500 रुपये मिळाले असून सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. 

इतर बातम्या :

Fact Check: दोन बँक खाती असल्यास दंड भरावा लागणार? आरबीआयच्या नावानं अनेक दावे,नेमकं सत्य काय?