Maharashtra Budget 2026, Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026-27) सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आणि आगामी वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी राज्याच्या भरभराटीच्या दृष्टीनं त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी वित्त खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. अशातच आजचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सादर केला.
विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित केला. तसेच, अजितदादांच्या आठवणीत काहीसे भावूक झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "माझं अंतःकरण जड झालंय. अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करड्या स्वभावामुळे शिस्त राहीली, त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं भव्य स्मारक उभारलं जाईल, नागरी पुरस्कार त्यांच्या नावानं सुरू केला जाईल... हा अर्थसंकल्प त्यांना सादर करतो...", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यासोबतच अर्थसंकल्पातून फडणवीसांनी मुंबईसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्यात.
राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय? (State Budget For Mumbai?)
- राज्यात शहरी विकास 70 टक्के लोकसंख्या होणार आहे, त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे.
- बुलेट ट्रेन तीन स्थानकाच 2027 पर्यंत पूर्ण होईल.
- तिसरी मुंबई म्हणून उरण परिसरात विकास होईल, चौथी मुंबई वाढवण येथे होईल.
- मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील.
- एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरं उभारणार, नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याचा रोडमॅप तयार होणार आहे.
- मुंबई आणि पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू
- राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग आणि 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील, 2019 पर्यंत 165 किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील.दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी 2028 पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत.
- वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- पनवेल ते कर्जत अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार आहे.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील तीन स्थानकांचं काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे.
- शहरांच्या विकासाठी 10 शहर विकास प्राधिकरण तयार करणार आहे.
- परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, त्यामुळे मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार आहे.
वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 (Wadala To Gateway Of India Mumbai Metro Line 11)
- वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23487 कोटी रुपये किंमतीचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पासून वांद्रे टर्मिनर्सपर्यंत करण्याचे नियोजन. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 8 हा 22862 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
- तळोजा ते खांदेश्वर मेट्रो मार्ग 2 मुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्था सुधारले. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणण्याची योजना. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मुंबईसाठी महत्त्वाच्या मोठ्या घोषणा? (Important Announcements For Mumbai In Budget 2026?)
- अजून एक भुयारी मेट्रो, वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया
- अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार
- राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग उभारणार
- 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार
- 2029 पर्यंत 165 किमी मेट्रो मार्गिका तयार करणार
- दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार
- वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार
- पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार