Maharashtra News Live Updates : हॅलिपॅडवर निवडणूक आयोगाचे भरारी पथक दाखल, नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांची होणार सभा

Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....  

प्रज्वल ढगे Last Updated: 14 Nov 2024 01:25 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे जोमात वाहते आहेत. ज्याच्या त्याच्या तोंडी निवडणुकीचीच चर्चा आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे....More

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा क्लबबाहेर राडा

शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा मातोश्री क्लब बाहेर राडा आणि त्यांचा महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे एका शिवसैनिकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.



खासदार रवींद्र वायकर यांच्या चार महिला कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मातोश्री क्लब बाहेर राडा मध्ये विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये चार शिवसैनिकांचा विरोधात गुन्हा दाखल झाला होता.



याच प्रकरणांमध्ये एमआयडीसी पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसैनिक विलास जाधव याला अटक केली आहे तर तीन आरोपी अजून फरार आहे त्यांच्या शोध एमआयडीसी पोलीस घेत आहे...