LPG Gas Price Cylinder Hike : देशभरात आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर लागू झाले आहेत. यंदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यात आतापर्यंत 346 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. तर, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मागील 22 मार्च रोजी एलपीजीच्या दरात वाढ झाली होती.
जवळपास चार महिन्यांच्या कालावधीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. तर, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरही या दरम्यान स्थिर होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 22 मार्च रोजी 50 रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती. देशातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅसचे दर 950 च्या घरात पोहचले. तर, पाटणामध्ये 1000 रुपयांचा दर गाठला.
असे आहेत नवे दर
19 किलोंचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर आजपासून 2253 रुपयांना मिळणार आहे. तर, कोलकातामध्ये हा दर 2087 ऐवजी 2351 रुपये आणि मुंबईत 1955 च्या ऐवजी 2205 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत 2406 रुपये मोजावे लागणार आहेत. एलपीजी गॅस दरवाढ, इंधन दरवाढीमुळे आता हॉटेलमधील खाद्यपदार्थाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
हवाई इंधन दरात वाढ
हवाई इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. एटीएफच्या दरात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून 1,12,925 किलोलीटर इतका दर झाला आहे. याआधी 1,10, 666 रुपये किलोलीटर इतका दर आहे. नवीन दर 15 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Ready Reckoner Rate : महागाईचा 'गृह'प्रवेश; राज्यात रेडिरेकनरच्या दरात वाढ
- आजपासून आपल्या आयुष्यात बरंच काही बदलतंय... निर्बंधमुक्ती, टॅक्ससह नेमकं काय काय बदललं, एका क्लिकवर वाचा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha