loksabha Election 2024 : देशात लोकसभेच्या निवडणूक (loksabha Election 2024) जवळ आली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये यासाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वत राजकीय पक्षांनी (Political Parties) तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष किती पैसे खर्च करतील? असा प्रश्न तुमच्या मनात पडलाच असेल. तर या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष प्रचारावर 1500 ते 2000 कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा उद्योग आणि प्रसिद्धीशी संबंधित असलेल्या लोकांना होणार आहे.


दरम्यान, अद्याप लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, सत्ताधारी भाजप सरकार आणि विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या लोकसभा निवडणुकीत विविध पक्ष प्रचारावर 1500 ते 2000 कोटी रुपये खर्च करू शकतात. यावरुन राजकीय पक्षांच्या तयारीचा अंदाज लावता येतो. एका अहवालात याबाबतची माहिती सांगितली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष निवडणूक प्रचारावर 1500 ते 2000 कोटी रुपये खर्च करू शकतात. अशा स्थितीत उद्योग आणि प्रसिद्धीशी संबंधित लोकांना त्याचा थेट फायदा होणार आहे. राजकीय पक्ष पैसा कुठे खर्च करण्याच्या तयारीत आहेत, याबाबतची देखील माहिती पाहुयात. 


वृत्तपत्र किंवा टीव्हीच्या प्रसिद्धीवर सर्वाधिक खर्च?


विविध राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराच्या बजेटपैकी 55 टक्के डिजिटल मीडिया आणि जाहिरातींवर आणि 45 टक्के इतर निवडणूक प्रचार यंत्रणेवर खर्च करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर खर्च करण्यात आलेली रक्कम 2029 च्या निवडणुकीपेक्षा खूप जास्त असेल.


'हे' पक्ष करणार निवडणुकीवर ज्यादा खर्च


भाजप आणि काँग्रेस पक्ष हे दोन पक्ष निवडणूक प्रचारावर जास्त पैसा खर्च करतील, तर प्रादेशिक राजकीय पक्षांचे निवडणुकीचे बजेट फारसे नसणार आहे. निवडणूक प्रचारासंदर्भात राजकीय पक्षांची विविध माध्यमांशी चर्चा सुरू आहे. केवळ प्रिंट मीडिया, ज्यामध्ये वर्तमानपत्रे, मासिके इत्यादींचा समावेश आहे, त्यांना राजकीय पक्षांकडून 300 ते 350 कोटी रुपयांच्या जाहिराती मिळण्याची शक्यता देखील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


2019 च्या निवडणूक प्रचारावर केवळ 200 कोटी रुपये खर्च 


गेल्या वर्षी 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारावर 250 कोटी रुपये खर्च केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2019 च्या निवडणूक प्रचारावर केवळ 200 कोटी रुपये खर्च झाले होते. ग्रुप एम दक्षिण आशियाचे सीईओ प्रशांत कुमार म्हणाले की, यावर्षी सार्वत्रिक निवडणुका, आयपीएल आणि आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमुळं जाहिरात उद्योगाला खूप फायदा होणार आहे. डिजिटल जाहिरात, ई-कॉमर्स आणि टीव्ही इंडस्ट्रीला खूप फायदा होईल.


महत्वाच्या  बातम्या:


राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकाचवेळी घेण्यासाठी चाचपणी, भाजपकडून गुप्त सर्व्हे?