नवी दिल्ली : राजकारणात मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. नेते कितीही नाही म्हटलं तरी निवडणुकांच्या काळात कोट्यावधी रुपयांचं खर्च करतात. पण तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत मंत्री (richest ministers in India) कोण? याबाबतची माहिती आहे का? बहुतेक लोकांना वाटते की सर्वात श्रीमंत नेता ज्योतिरादित्य सिंधिया किंवा डी.के. शिवकुमार असतील. पण तसे नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अलीकडील अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांची संपत्ती 5 हजरा 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अनेक मंत्र्यांनी इतकी संपत्ती जमा केली आहे की त्यांनी अनेक प्रमुख उद्योगपतींना मागे टाकले आहे. पाहुयाक सविस्तर माहिती

कोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत मंत्री? 

एडीआर अहवालानुसार, भारतातील एकूण 643 मंत्र्यांपैकी 36 अब्जाधीश आहेत. याचा अर्थ असा की सुमारे 6 'टक्के मंत्र्यांकडे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आहे. एकूणच, सर्व मंत्र्यांची घोषित मालमत्ता 23 हजार 929 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सर्वात श्रीमंत मंत्री म्हणून, तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) चे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (Chandra S. Pemmasani) हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. ते आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील आहेत. अहवालानुसार, त्यांची मालमत्ता 5 हजार 705 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्यावर 1 हजार 38 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. काँग्रेस पक्षाचे डीके शिवकुमार हे 1 हजार 413 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मंत्री आहेत.

भारतीय जनता पक्षाकडे (भाजपकडे) सर्वाधिक अब्जाधीश मंत्री 14 आहेत. तर काँग्रेसकडे 11 अब्जाधीश मंत्री आहेत.

सर्वात श्रीमंत मंत्री कोणत्या राज्यात आहेत? 

कर्नाटकात आठ अब्जाधीश मंत्री आहेत, जे इतर कोणत्याही भारतीय राज्यापेक्षा जास्त आहेत. आंध्र प्रदेशात 6, महाराष्ट्रात 4, तर अरुणाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि तेलंगणामध्ये एकूण 2 आहेत. गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 1 अब्जाधीश मंत्री आहे.

श्रीमंत मंत्र्यांची यादी

१. डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी - 5,705 कोटी+, टीडीपी, गुंटूर (आंध्र प्रदेश)२. डी.के. शिवकुमार – 1413 कोटी+, काँग्रेस, कनकपुरा (कर्नाटक)3. नारा चंद्राबाबू नायडू – 931 कोटी+, TDP, कुप्पम (आंध्र प्रदेश)4. नारायण पोंगुरु -824 कोटी+, TDP, नेल्लोर शहर (आंध्र प्रदेश)5. सुरेशा बीएस – 648 कोटी+, काँग्रेस, हेब्बल (कर्नाटक)6. गद्दम विवेकानंद - 606  कोटी+, काँग्रेस, चेन्नूर (तेलंगणा)7. नारा लोकेश – 542 कोटी+, TDP, मंगलगिरी (आंध्र प्रदेश)8. मंगल प्रभात लोढा – 447 कोटी+, भाजपा, मलबार हिल्स (महाराष्ट्र)9. पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी – 433 कोटी+, काँग्रेस, पालेर (तेलंगणा)10. ज्योतिरादित्य सिंधिया – 424 कोटी+, भाजपा, गुना (मध्य प्रदेश)

चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) सर्वाधिक अब्जाधीश मंत्री आहेत (14), तर काँग्रेसकडे 11 मंत्री आहेत. तेलुगू देसम पक्षाकडे 6 अब्जाधीश मंत्री आहेत आणि आम आदमी पक्ष, जेडीएस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांमध्येही अब्जाधीश मंत्री आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत ज्यांची संपत्ती 931कोटी रुपये आहे.