List of Richest in India : फोर्ब्स इंडिया (Forbes India) दरवर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी (List of Richest) जाहीर करते. अलिकडच्या वर्षांत, गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत वर्चस्व मिळवलंय. परंतू, अंबानी-अदानी यांच्यायापूर्वी देशात कोण श्रीमंत होते. जगातील अब्जाधिशांच्या यादीत अनेक भारतीय लोकांनी स्थान मिळवलं होतं. पाहुयात त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती. 


एकेकाळी विप्रोचे अझीम प्रेमजी ते लक्ष्मी मित्तल यांची भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत नावे होती. आजआपण त्या अब्जाधीशांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी अंबानी आणि अदानी यांच्या आधी फोर्ब्सच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून नाव मिळवलं आहे. 


कुमार मंगलम बिर्ला


या यादीत पहिले नाव आहे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचे. 1996 मध्ये फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव अग्रस्थानी होते. सध्या त्यांची एकूण संपत्ती 19.2 अब्ज डॉलर्स आहे.


लक्ष्मी मित्तल


जगातील सर्वात मोठे स्टील टायकून लक्ष्मी मित्तल यांचाही या यादीत समावेश आहे. मित्तल हे सलग दोन वर्षे भारतातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत प्रथम होते. 1997 आणि 1998 मध्ये लक्ष्मी मित्तल हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. त्यानंतर, 2004 ते 2008 पर्यंत, लक्ष्मी मित्तल पुन्हा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले. सध्या त्यांची एकूण संपत्ती 16.8 अब्ज डॉलर्स आहे.


अझीम प्रेमजी


विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांचे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नेहमीच नाव असते. याशिवाय अझीम प्रेमजी हे देशातील सर्वात मोठे परोपकारी आहेत. सुमारे 5 वर्षे ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहिले. 1999 ते 2003 पर्यंत त्यांच्या आजूबाजूला एकही व्यापारी नव्हता. सध्या अझीम प्रेमजींची एकूण संपत्ती 12 अब्ज डॉलर्स आहे.


मुकेश अंबानी


मुकेश अंबानी हे अनेक वर्षापासून भारतातील श्रीमंत व्यक्ती आहेत.  2023 मध्ये ते भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. त्यापूर्वी 2009 ते 2021 पर्यंत म्हणजे 13 वर्षे मोनोलिथ म्हणून त्यांनी राज्य केले. त्यांना या स्थानारुन कोणीही हलवू शकले नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेली वाढ. सध्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 113.6 अब्ज डॉलर्स आहे.


गौतम अदानी


2022 हे वर्ष पूर्णपणे गौतम अदानी यांच्या नावावर आहे. गौतम अदानी यांची संपत्ती 150 अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचली होती. ते जगातील 3 रे सर्वात श्रीमंत होते. आजपर्यंत एकही उद्योगपती, अगदी मुकेश अंबानीही या पातळीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सध्या त्यांची एकूण संपत्ती 82.5 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.


महत्वाच्या बातम्या:


World Richest Person : जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानी आणि अदानी कोणत्या स्थानावर? एकूण संपत्ती जाणून घ्या