LIC Listing LIVE : एलआयसीचा शेअर डिस्काउंटमध्ये लिस्ट, जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स

LIC Listing Live: एलआयसी कंपनी आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. अपेक्षेपेक्षा कमी दरात एलआयसीची लिस्टिंग झाल्याने गुंतवणुकदार संभ्रमात आहेत. तज्ज्ञांनी दीर्घकाळ गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 May 2022 02:26 PM

पार्श्वभूमी

LIC Listing Live : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनी (LIC) आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. शेअर बाजारात एलआयसी आठ टक्क्यांच्या डिस्काउंट दराने लिस्ट झाला आहे....More

एलआयसीची निराशाजनक सुरुवात; गुंतवणुकदारांना 42 हजार कोटींचा फटका

बहुप्रतिक्षित असलेल्या एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात आज सूचीबद्ध (लिस्टिंग) झाला. शेअर बाजारात लिस्ट होताना एलआयसीचा शेअर जवळपास 9 टक्के डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. एलआयसीच्या या निराशाजनक लिस्टिंगचा फटका गुंतवणुकदारांना बसला आहे. एलआयसीने आपल्या प्रति शेअरची किंमत 949 रुपये निश्चित केली होती. मात्र, डिस्काउंट लिस्टिंगमुळे गुंतवणुकदारांना 42 हजार 500 कोटींचा फटका बसला आहे.