LIC Saral Pension Plan: पैशांना म्हातारपणाची काठी म्हटलं जातं. तरुण वयात नोकरीच्या माध्यमातून जमा केलेले पैसे म्हातारपणासाठी जपून ठेवले तरच म्हातारपणी आर्थिक चणचण भासत नाही. म्हातारपणी नोकरी करता येत नाही. त्यामुळे चरितार्थासाठी तसेच औषधं, उपचारासाठी तरुण वयात जमा केलेला पैसा कमाला येतो. त्यामुळेच नोकरीवर असताना  तुम्ही योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. नोकरीला असतानाच रिटायरमेंट प्लॅनिग करणं गरजेचं आहे.  
एलआयसी या विमा संस्थेकडे म्हातारपणी पैसे देणारा असाच एक प्लॅन आहे. वार्धक्याच्या काळात हा प्लॅन तुम्हाला चांगले पैसे देऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास नोकवरीवर असताना तुम्ही एलआयसीच्या या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला म्हातारपणी चांगले पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे एलआयसीकडून मिळणाऱ्या या पेन्शनसाठी 60 वर्षे होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्हाला वयाच्या 40 वर्षीदेखील हे पेन्शन मिळू शकते. 


पेन्शन देणारा एलआयसीचा प्लॅन कोणता आहे? 


एलआयसीकडून दिला जाणारा हा एक पेन्शन प्लॅन आहे. याला सरल पेन्शन प्लॅन म्हटले जाते. या प्लॅनअंतर्गत तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन चालू होते. ही पॉलिसी घेताना तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागतो. प्रिमियम दिल्यानंतर विमाधारकाला लगेच पेन्शन मिळणे चालू होते. पॉलिसी घेणाऱ्याचा मृत्यू झाल्यास गुंतवलेली रक्कम ही पॉलिसी धारकाच्या नॉमिनीला परत केली जाते.  


एकटे किंवा जोडीदारासोबत घेता येतो प्लॅन


सरल पेन्शन प्लॅनचा फायदा हा एकट्या व्यक्तीला किंवा जोडीदारासोबतही घेता येतो. सिंगल प्लॅनमध्ये पॉलिसीधारक जोपर्यंत जिंवत आहे, तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झालास गुंतवलेली रक्कम परत दिली जाते. पती-पत्नीसाठी जॉइंट प्लॅन घेतला असेल तर प्रायमरी पॉलिसीधारकाला तो जिंवत असेपर्यंत पेन्शन दिले जाते. प्रायमरी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या जोडीदाराला पेन्शन दिले जाते. दोघांचाही मृत्यू झाल्यास जमा असलेली रक्कम नॉमिनीला दिली जाते. 


पेन्शन किती मिळणार? 


सरल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही 1000 रुपयांचे मासिक पेन्शन घेऊ शखता. जास्तीत जास्त पेन्शन घेण्यावर कोणतेही बंधन नाही. तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या आधारावर तुम्हाला किती पेन्शन द्यायचे हे ठरवले जाते. तुम्हाला मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक अशा कालावधीसाठी पेन्शन घेण्याचा पर्याय असतो. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार तुम्हाला पेन्शन मिळते. 


वयाच्या 40 वर्षांपासून घेऊ शकता फायदा 


एलआयसीच्या या प्लॅन अंतर्गत तुम्हाला निवृत्त होण्याची वाट पाहणे गरजेचे नाही. तुम्ही 40 ते 80 वर्षांपर्यंत कधीही या प्लॅनअंतर्गत गुंतवणूक करू शकता. सरल पेन्शन स्कीमअंतर्गत तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक करत असाल तर त्याच वयापासून तुम्हाला पेन्शन चालू होते. तुम्ही हयात असेपर्यंत तुम्हाला हे पेन्शन मिळते. 


तुम्ही घेतलेल्या या प्लॅनवर एलआयसी तुम्हाला लोनदेखील देते. प्लॅन खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांनी तुम्हाला लोनची सुविधा मिळते. आपत्कालीन स्थितीत तुम्हाला पॉलिसी सरेंडर करता येते. 


हेही वाचा :